भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ‘कॅप्टन कूल’ ही उपाधी मिळाली आहे. तो आज अर्थात 7 जुलै रोजी आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘माही’ आणि ‘कॅप्टन कूल’ या नावाने जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या धोनीचा जन्म 7 जुलै 1981 मध्ये रांची येथे झाला होता. तो नेहमीच आपला वाढदिवस कोणताही गोंगाट न करता एकदम साध्या पद्धतीने साजरा करतो. धोनी जरी सोशल मीडियावर सक्रीय नसला तरीही चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून धोनीवर अनेक वेळा आपले प्रेम दर्शवतात.
धोनीच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर एका चाहत्यांने असे काही काम केले आहे, ते पाहून सर्वांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. ते जर तुम्ही पाहिले तर तुम्ही देखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्सच्या एका अधिकृत फॅन पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका कलाकाराने काडीपेटीच्या मॅचस्टिकच्या मदतीने धोनीचे भव्य चित्र बनवले आहे. त्या कलाकाराने मॅचस्टीक्स जाळून राखेपासून सुंदर चित्र बनवले आहे. आतापर्यंत धोनीने या व्हिडिओवर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे की, धोनी या चाहत्याला कशा पद्धतीने धन्यवाद म्हणेल?
https://www.instagram.com/p/CQ-ltMUBBIo/?utm_source=ig_web_button_share_sheet
धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे
धोनीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर तो जगातील एकमेव कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तीनही ट्रॉफी जिंकल्या आहेत. साल 2007 मध्ये टी20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी हे तीनही किताब भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत.
परंतु आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या रूपात चाहत्यांसमोर आणखी एक आयसीसीचा किताब आणला आहे. यामध्ये भारत आणि न्यूझीलंडने प्रथमच झालेल्या या अजिंक्यपदच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. जिथे न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा आठ विकेटने पराभव करत विराट कोहलीसह अनेक क्रिकेटप्रेमींचे स्वप्न मोडले आणि न्यूझीलंड संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदचे विजेतेपद मिळविले.
महत्त्वाच्या बातम्या-
ऍलेक्स केरीने दाखवली अफलातून हुशारी, सीमारेषेवर टिपला अप्रतिम झेल; पाहा व्हिडिओ
इंग्लंड संघात कोरोनाची एंट्री, भारतीय खेळाडूंच्या बचावासाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; करणार ‘हे’ काम
रोहित अन् ‘हा’ फलंदाज करणार ओपनिंग, शॉला इंग्लंडला पाठवण्याची मागणी निवडकर्त्यांनी फेटाळली!





