---Advertisement---

रिषभ पंत बोल्ड होताच लॉर्ड्समध्ये घडला इतिहास! 21व्या शतकात पहिल्यांदाच घडले असे काही

On: सोमवार, जुलै 14, 2025 6:25 PM
---Advertisement---

India vs England Lord’s Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड बनले आहेत. फलंदाज जोरदार धावा करत आहेत, तर गोलंदाजही आपला जलवा दाखवत आहेत. 10 जुलैपासून लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी रिषभ पंत क्लीन बोल्ड झाला. तो आउट होताच एक मोठा रेकाॅर्ड घडला. (Lord’s Test record)

रिषभ पंत या सामन्यात क्लीन बोल्ड होणारा 14 वा फलंदाज ठरला. साल 2000 नंतर पहिल्यांदाच असे घडले आहे, जेव्हा एकाच कसोटी सामन्यात 14 फलंदाज बोल्ड झाले आहेत. 2000 वर्षापूर्वी असे कारनामे घडले होते. म्हणजेच, 21व्या शतकात कसोटी सामन्यात असे पहिल्यांदाच घडले, जेव्हा एखाद्या कसोटी सामन्यात 14 फलंदाज क्लीन बोल्ड झाले. यात भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांतील खेळाडूंचा समावेश आहे. (Most clean bowled in Test match)

सामन्याच्या चौथ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या. पण खास गोष्ट अशी आहे की, त्याने सर्व फलंदाजांना क्लीन बोल्ड केले होते. सुंदरने जो रूट, बेन स्टोक्स, जेमी स्मिथ आणि शोएब बशीरला क्लीन बोल्ड करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. (Washington Sundar bowling)

इंग्लंडने पहिल्या डावात 387 धावा केल्या होत्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाने पहिल्या डावात केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर 387 धावा करून स्कोअर बरोबरीत आणला होता. इंग्लंडने दुसऱ्या डावात 192 धावा केल्या होत्या, भारतीय संघाला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. पण, चौथ्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत भारतीय संघाने 4 विकेट्स गमावल्या होत्या. तर, पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारताने पहिल्याच सत्रात केएल राहुल, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरच्या विकेट्स गमावल्या आहेत. बातमी लिहेपर्यंत भारतीय संघाने 8 विकेट्स गमावल्या आहेत. भारतीय संघाला विजयासाठी 70 धावांची गरज आहे. (Indian cricket team Lord’s)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---