भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2022 मधील दुसरा सामना गुरुवारी (27 ऑक्टोबर) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी संघासाठी अर्धशतकीय योगदान दिले. या तिघांच्या खेळीमुळे भारतीय संघ अपेक्षित धावसंख्या गाठू शकला. प्रत्योत्तरात नेदरलँड्सचे फलंदाज खेळपट्टीवर आले, तेव्हा एकापाठोपाठ विकेट्स गमावू लागले. याचदरम्यान, स्टॅन्डमध्ये असे काहीतरी घडले, ज्याकडे सर्वांचेच लक्ष्य वेधले गेले आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याच सोबद विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 2 विकेट्सच्या नुकसानावर 179 धावा केल्या. नेदरलँड्सला विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सचे फलंदाज अपेक्षित प्रदर्शन करताना दिसले नाहीत. पण स्टॅन्डमधील एका घटनेकडे मात्र सर्वांचेच लक्ष्य वेधले गेले.
चाहते सामन्याचा आनंद घेत असताना स्टॅन्डमधील एक ‘प्रेमी युगल’ स्क्रीनवर दिसले. त्यातील युवकाने त्याच्या प्रेयसीला अंगठी देत लग्नाची मागणी घातली. प्रेयसीने देखील क्षणाचा विलंब न करता होकार लग्नासाठी होकार दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आयसीसी आणि टी-20 विश्वचषकाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून चाहत्यांनी यावर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. यापूर्वी देखील असे अनेक प्रकार क्रिकेटच्या सामन्यात घडले आहेत. अशात चाहत्यांचा अशा प्रकराचा अजून एक रोमांचक व्हिडिओ पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/reel/CkNlIJQL52x/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याच विचार केला, तर भारताकडून मिळालेले लक्ष्य नेदरलँड्स संघ गाठू शकला नाही. नेदर्लंड्स संघ मर्यादित 20 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 123 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताने हा सामना 56 धावांच्या अंतराने जिंकला. टी-20 विश्वचषकातील भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय असून संघ ग्रुप 2 मध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जिंकलो रे! नेदरलँड्सला पराभूत करत भारताची विजयी घोडदौड सुरूच, 56 धावांनी सामना घातला खिशात
नेदरलँड्सविरूद्ध नाण्याचे नशीब टीम इंडियाच्या बाजूने; प्रथम फलंदाजीचा निर्णय; अशी आहे प्लेइंग इलेव्हन






