भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. या सामन्यात केएल राहुल फ्लाॅप ठरला. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केले. काहींनी तर त्याला संघातून बाहेर काढण्याची देखील मागणी केली. पण आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याच्यामुळे न्यूझीलंडविरूद्धचा त्याचा हा शेवटचा सामना होता का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
बेंगळुरू कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये केएल राहुल (KL Rahul) फ्लाॅप ठरला. 46 धावात गुंडाळलेल्या भारतीय संघाच्या पहिल्या डावात राहुल शून्यावर बाद झाला. दुसऱ्या डावात रिषभ पंत (Rishabh Pant) आणि सरफराज खान (Sarfaraz Khan) यांनी भारताला मजबूत स्थितीत आणले होते, तेव्हा राहुलकडून अपेक्षा होती की तो चांगली फलंदाजी करून भारताला मोठ्या आघाडीच्या दिशेने घेऊन जाईल, पण तसं झालं नाही. राहुल 12 धावा करून बाद झाला.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये केएल राहुल (KL Rahul) सामना संपल्यानंतर बंगळुरूच्या खेळपट्टीला स्पर्श करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो खेळपट्टीला स्पर्श करताना आणि वाकताना दिसत होता. हे पाहून अनेक चाहत्यांचा असा विश्वास आहे की, राहुलची ही शेवटची कसोटी होती. या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करत आहेत. पण राहुलची ही शेवटची कसोटी असल्याचे अद्याप स्पष्ट झालं नाही.
Kl Rahul last test match confirmed🥳pic.twitter.com/06q2SVpD3j
— Abhishek (@be_mewadi) October 20, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
SA vs BAN; पहिल्या कसोटीत खेळणार का शाकिब अल हसन? कर्णधार म्हणाला…
वीरेंद्र सेहवागचे ‘हे’ 5 रेकाॅर्ड मोडीत काढणे कोणत्याही फलंदाजासाठी अशक्य!
IND vs NZ; दुसऱ्या कसोटीत केएल राहुलसह ‘या’ खेळाडूची होणार सुट्टी?