भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी आयपीएल 2023 साठी तयार दिसत आहे. आगामी आयपीएल हंगामातील पहिलाच सामना धोनीच्या नेतृत्तवातील चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता संघ गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. उभय संघांतील हा सामना 31 मार्च रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करताना दिसत आहे. तत्पूर्वी दिग्गज धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे कर्णधार आगामी हंगामात एका नवीन भुमिकेत दुसण्याची शक्यता तयार होत आहे.
मागच्या तीन आयपीएल (CSK) हंगामांमध्ये सीएसकेला त्यांचे होम ग्राऊंड चेपॉक स्टेडियमवर खेळता आले नाही. कोरोनाच्या कारणास्तव मागचे तीन आयपीएल हंगाम भारताच्या बाहेर आयोजित केले गेले होते. पण यावर्षी आयपीएल पुन्हा एकदा भारतात आयोजित केली गेली आहे. त्यामुळे सीएसके पुन्हा एकदा चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सराव करताना दिसत आहे. आयपीएल 2023 चा पहिला सामना अवघ्या काही दिवसांवर असताना एमएस धोनी (MS Dhoni) चेपॉक स्टेडियमवर मोठमोठे शॉट्स खेळताना दिसत आहे. पण सीएसकेने गुरुवारी (23 मार्च) शेअर केलेल्या एका व्हिडिओत धोनी गोलंदाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CqIw6vihLpV/?utm_source=ig_web_copy_link
व्हिडिओत सुरुवातील धोनी फिरकी गोलंदाजी करताना दिसत आहे. कमाल म्हणजे या चेंडूवर फलंदाजी करताना देखील धोनीच दिसतो. सीएसकेने शेअर केलेला हा व्हिडिओ अवघ्या 20 सेकंदांचा आहे, पण चाहत्यांना चांगलाच भावला आहे. व्हिडिओत धोनी स्वतःच्याच चेंडूवर जबरदस्त षटकार मारला आहे.
दरम्यान, आयपीएल 2023 धोनीच्या कारकिर्दीतील शेवटची आयपीएल असू शकते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ऑगस्ट 2020 मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. पण आयपीएलमध्ये मात्र तो अजूनही खेळत आहे. मागच्या काही आयपीएल हंगामांमध्ये धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे. मात्र, यावर्षी या चर्चा अधिकच होत आहे. कारण धोनीने आधी सांगितल्याप्रमाणे तो यावर्षी आपल्या होम ग्राऊंडवर चाहत्यांच्या समोर आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतो. धोनीने आयपीएल आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत चार ट्रॉफी जिंकल्या आहेत. यावर्षी देखील दो संघाला ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी प्रयत्नशील अलेल. यावर्षीच सीएसकेने आयपीएल ट्रॉफी जिंकली, तर संघ मुंबई इंडियन्सच्या पाच आयपीएल ट्रॉफिंची बरोबरी करू शकतो.
(A video of MS Dhoni in CSK’s practice session is going viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘द हंड्रेड’ ड्राफ्टमध्ये रिझवान-बाबर ‘दुर्लक्षित’! मुंबई इंडियन्सचा शिलेदार ठरला टॉप पिक
“बीसीसीआय आणि भारतीय संघ पराभवाला घाबरतात”, पाकिस्तानी खेळाडूचे वादग्रस्त विधान