बीजिंग 2008 ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्ण पदके मिळवणारी प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन जलतरणपटू स्टेफनी राईस हिने एका एका मीट आणि ग्रीट कार्यक्रमात हजेरी लावली होती. वेव्हलाइन स्पोर्ट्स, भारतातील जीवनशैली म्हणून जलतरणाला चालना देणारे एक प्रमुख नाव आहे. यांनी अलीकडे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात स्टेफनीने प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमात पुण्यातील तरुण इच्छुक जलतरणपटूं सहभागी झाले. त्यामुळे तरुण जलतरणपटूंमध्ये प्रेरणा आणि उत्साही वातावरण निर्माण झाले. पुण्यातील एरिया37 क्लबमधील मीट अँड ग्रीट कार्यक्रमाला 200 हून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली.
या महत्त्वाच्या प्रसंगामुळे उपस्थितांना स्टेफनी राईस (Stephanie Rice) आणि तिच्या ऑलिम्पिक पदकांसह अविस्मरणीय आठवणी कॅप्चर करता आल्या. तसेच स्विमिंग चॅम्पियनसोबत एका आकर्षक प्रश्नोत्तर सत्राद्वारे प्रबोधनासाठी एक व्यासपीठही उपलब्ध झाले. तसेच, उपस्थितांना स्टेफनीने स्वाक्षरी केलेल्या वस्तू देखील मिळाल्या. हा कार्यक्रम युवा पिढीच्या स्वप्नांना प्रेरित आणि खेळाची आवड जोपासण्यासाठी एक प्रेरणा मिळाली.
यावेळी बोलताना वेव्हलाइन स्पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक, मोहसीन काझी म्हणाले की , “स्टेफनी राईस यांना पुण्यात आणणे ही एक विलक्षण संधी होती. वेव्हलाइन स्पोर्ट्सचा उद्देश असा होता की, स्टेफनी यांच्या कथेने तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल तसेच जलतरणपटूंना खेळा मध्ये सक्षम करणे. या कार्यक्रमाने आमचा उद्देश साकार होईल असे नक्कीच दिसून येत येईल. आम्हाला आशा आहे की स्टेफनी यांच्या प्रेरणा दायी धड्यांनी आमचे स्थानिक जलतरणपटू त्यांचे ध्येय नक्कीच गाठण्यासाठी.”
या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण म्हणजे स्टेफनी राईससोबत खेळाडूंनी एक मनमोहक प्रश्नोत्तरांचा संवाद केला. बलिदान, आव्हाने आणि विजयांसह स्टेफनी ने तिचा प्रवास शेअर केला, ज्याने तिला चॅम्पियन बनवले. स्पर्धात्मक पोहणे, प्रशिक्षण आणि मानसिकता याविषयीची तिची दृष्टिकोन तरुण खेळाडूंना महत्वाचा ठरेल, त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देते. यावेळी स्टेफनीचा तरुण खेळाडूंना संदेश असा होता की, “दृढनिश्चय आणि आत्मविश्वासाने काहीही शक्य आहे.”
तसेच यावेळी आपला आनंद व्यक्त करताना, एरिया 37 क्लबचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि आगामी कार्यक्रमाचे ठिकाण भागीदार श्री सुरेश आयर म्हणाले, “आमचे ध्येय एक अतुलनीय जीवनशैली अनुभव प्रदान करणे, अपेक्षांना मागे टाकणे आणि आमच्या आदरणीय सदस्यांसाठी अविस्मरणीय आठवणी निर्माण करणे हे आहे.”
या कार्यक्रमाने स्थानिक जलतरण समुदायाला एकत्र आणले, ज्यामुळे त्यांना त्यांची आवड सामायिक करता आली आणि स्टेफनी राइस या प्रसिद्ध जलतरणपटूशी भेटण्याची संधी प्राप्त झाली. तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे खेळाडूंना शैक्षणिक आणि आनंददायी अनुभव मिळाला. वेव्हलाइन स्पोर्ट्स स्टेफनी राईससह मीट अँड ग्रीट इव्हेंट सारख्या उपक्रमांद्वारे पुणेकर, खेळाडू आणि ऍथलेटिसिझमला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे, तरुण खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती आणि उत्कृष्टतेची संस्कृती वाढवणे हे यांचे ध्याय आहे. (A visit from Olympic gold medalist Stephanie Rice gave wings to the dreams of swimmers in Pune)
हेही वाचा-
‘शुबमन बाहेर पडला तर भारताला फरक पडला नाही अन् नसीममुळे आम्हाला…’, शोएब मलिकचे मोठे विधान
ऑस्ट्रेलिया बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला कशी रोखणार? बावुमाची सेना करणार बॅटिंग; सामन्यात महत्त्वाचे 3 बदल