पुणे (27 मार्च 2024) – आजचा चौथा सामना सातारा विरुद्ध जालना यांच्यात झाला. सामन्याची सुरुवात अत्यंत सावध झाली. जालनाच्या वीरेंद्र मंडलिक चांगला खेळ करत संघाला गुण मिळवून दिले. 10 मिनिटाच्या खेळानंतर जालना संघाकडे 7-4 अशी आघाडी मिळवळी होती. त्यानंतर काही मिनिटातच जालना संघाने सातारा संघाला ऑल आऊट करत आघाडी मिळवली.
जालनाच्या आकाश दिवाते अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत संघाला आघाडी मिळवून दिली. वीरेंद्र मंडलिक ने आक्रमक चढाया करत गुण मिळवले. जालना संघाने मध्यंतराला 16-08 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतर सातारा संघाने चांगला प्रतिकार करत सामन्यात रंगत आणली होती. साताराच्या गणेश आवळे व यश निकम यांनी चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवत संघाची पिछाडी कमी केली. शेवटची चार मिनिटं शिल्लक असताना 29-24 अशी जालना संघाकडे आघाडी होती.
जालना संघाकडुन सांघिक खेळाचे प्रदर्शन करत सामन्यावरील आपली पकड सोडली नाही. जालना संघाने 33-28 असा विजय मिळवला. जालना कडून आकाश दिवाते ने चढाईत 4 पकडीत 5 गुण मिळवले. वीरेंद्र मंडलिक व दीपक जाधव ने चढाईत प्रत्येकी 7 गुण मिळवले. सनी राठोड ने पकडीत 5 गुण मिळवले. सातारा कडून गणेश आवळे ने सर्वाधिक 10 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- गणेश आवळे, सातारा
बेस्ट डिफेंडर- आकाश दिवाते, जालना
कबड्डी का कमाल – सनी राठोड, जालना
महत्वाच्या बातम्या –
रेलीगेशन फेरीचा रायगड विरुद्ध नाशिक पहिला सामना बरोबरीत
रेलीगेशन फेरीत धुळे संघाची लातूर संघावर मात