इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा (Ipl 2022) येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएल स्पर्धेचा मेगा ऑक्शन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी १० फ्रँचायजिंनी ३३ खेळाडूंना रिटेन केले आहे. तर उर्वरित खेळाडू ऑक्शनमध्ये दिसून येणार आहेत. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटूने चेन्नई सुपर किंग्ज संघाने (Chennai super kings) रिटेन केलेल्या खेळाडूबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोपडा (Aakash chopra) म्हणाला की, “धोनी (Ms Dhoni) वर १२ कोटी रुपये खर्च करून चेन्नई सुपर किंग्ज संघाने कार्ड खेळले आहे. हा संघ ४८ ऐवजी ५४ कोटी रुपये घेऊन मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होऊ शकला असता. ही फ्रँचायजी युवा खेळाडूंच्या जागी अनुभवी खेळाडूंना संधी देणार. ते फाफ डू प्लेसिसला संघात पुन्हा घेऊन घेण्याच्या प्रयत्नात असू शकतात. तसेच शिखर धवनवर देखील त्यांचा डोळा असणार आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “जर येणाऱ्या तीन वर्षांचा विचार केला तर, अंबाती रायुडू आणि रॉबिन उथप्पा यांची निवड वादग्रस्त ठरेल. हा संघ शार्दुल ठाकूर किंवा दीपक चाहर यांपैकी एकाला आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करू शकते. ही फ्रँचायजी देखील त्याच खेळाडूंना मिळवण्याचा प्रयत्न करू शकते, ज्यांनी या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना पुढील कर्णधारासाठी १५ कोटी रुपये खर्च करायला आवडणार नाही.”
“दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर यांना गमावणे हे संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये ते शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर यांना कसे मिळवायचे याच प्रयत्नात असू शकतात. जर ते असे करण्यात अपयशी ठरले तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी ते कोणाला संधी देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.” असे आकाश चोपडा म्हणाला.
महत्वाच्या बातम्या:
एकावन्न वर्षांपुर्वी जर पैशांचा पाऊस पडला नसता, तर कदाचित ‘वनडे क्रिकेट’चे नावदेखील नसते
दुसऱ्या वनडे सामन्यात ‘हा’ फलंदाज करू शकतो रोहित सोबत डावाची सुरुवात, स्कायने केला खुलासा
टूर वॉश! इंग्लंड महिला संघाचाही ऑस्ट्रेलियात सुपडा साफ; १९ सामन्यांनंतरही विजयाची पाटी कोरी