भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाला फारसा वेळ उरलेला नाही. भारतीय संघाचा उपकर्णधार व अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याकडून संघ व संपूर्ण देशवासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर हार्दिकची कामगिरी म्हणावी तशी झाली नव्हती. खेळाच्या दोन्ही विभागात त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. आता हार्दिक आशिया कपमध्ये खेळताना दिसणार असून त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. असे असतानाच भारताचा माजी क्रिकेटपटू व प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने मोठे वक्तव्य केले आहे.
आपल्या यु ट्युब चॅनेलवर बोलताना आकाश याने भारतीय खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्म व मागील काही महिन्यातील कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्याने हार्दिकविषयी आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,
“हार्दिक पंड्याने गेल्या वर्षभरात आठ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 198 धावा केल्या असून, यखत एका अर्धशतकाचा समावेश आहे. यासोबतच त्याने 9 विकेट देखील घेतल्या आहेत. याचा अर्थ तो प्रत्येक सामन्यात जवळपास एक विकेट घेतो. यादरम्यान त्याने 44 षटके टाकली आहेत. यावरून असे दिसून येते की, त्याने प्रत्येक सामन्यात सहा षटकेही टाकली नाहीत. भारतीय संघाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट नाही. भारतीय संघाच्या संतुलनाच्या नजरेने पाहिल्यास हार्दिकने अधिक गोलंदाजी करावी असे वाटते.”
हार्दिक अनेक वेळा भारतीय संघासाठी गोलंदाजीची सुरुवात देखील करत असतो. कर्णधार रोहित शर्मा हा त्याचा कशाप्रकारे वापर करतो हे पाहणे महत्त्वाचे असेल. आशिया चषक व त्यानंतर होणाऱ्या वनडे विश्वचषकात हार्दिक भारताचा पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू असेल.
(Aakash Chopra Bold Statement On Hardik Pandya Before Asia Cup)
हेही वाचा-
एशियन गेम्ससाठी ‘हा’ दिग्गज बनला ऋतुराज ब्रिगेडचा गुरु, सुवर्णपदकाचे ठेवले लक्ष्य
Video: आऊट झाल्याच्या रागात फलंदाजाने फेकली बॅट; पुढं जे झालं, ते तुम्हीच पाहा