भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) याने दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी खुलासा केला होता की, टी२० संघाचे कर्णधारपद सोडताना कोणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नव्हता. परंतु, आता संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा (chetan sharma) यांनी याबाबतीत स्पष्टीकरण दिले आहे. चेतन शर्मांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर हा वाद पुन्हा पेटण्याच्या शक्यता आहे. अशात आता भारताचे माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा (aakash chopra) यांनी देखील याबाबत त्यांचे मत मांडले आहे.
चेतन शर्मांनी टी२० संघाच्या कर्णधारपदाबाबत बोलताना संगितले की, निवड समितीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांनी विराटला टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या त्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावयाला संगितले होते. शर्मांनी हे स्पष्टीरकण दिल्यामुळे विराटकडून पुन्हा एकदा प्रत्युत्तर येईल असा अनेकांचा अंदाज आहे. आकाश चोप्रांना देखील तसचे वाटते.
आकाश चोप्रा त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले की, “आता आगीत थोडे अजून तेल ओतले गेले आहे, जे आधीपासूनच होते. चेतन शर्मांचे वक्तव्य बोर्डचेच वक्तव्य आहे. कारण ते मुख्य निवडकर्ते आहेत.” चेतन शर्मा म्हणाले होते की, आम्ही सर्वजण कोहलीला कर्णधारपद सोडू नको म्हणालो होतो. कारण, यासाठी ही योग्य वेळ नव्हती आणि त्याचा परिणाम टी२० विश्वचषकावर पडला असता. परंतु, विराटने ऐकले नाही, विराटला तेच करायचे होते. तर दुसरीकडे विराट यापूर्वी स्पष्टीकरण देताना म्हणाला होता की, त्याला कर्णधारपद सोडू नको असे कोणीच म्हटले नव्हते. सर्वांनी असेच सांगितले होते की, यामुळे फायदाच होईल.
दरम्यान, टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्याच्या अवघ्या दिड तासांपूर्वी विराटला या गोष्टीची माहिती दिली होती, असेही विराट म्हणाला होता. अशात चोप्रांच्या मते, चेतन शर्मांनी केलेल्या वक्तव्यानंतर विराट कोहली नक्कीच त्याच्या बाजूने पुन्हा स्पष्टीकरण देऊ शकतो. जर विराटने पुन्हा स्पष्टीकरण दिले, तर त्यांना याचे आश्चर्य देखील वाटणार नाही, असे आकाश चोप्रांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
जो रूटवर माजी इंग्लिश कर्णधाराची खरमरीत टीका; म्हणाला…
सर्वकालीन महान प्रशिक्षक काढणार इंग्लडला पराभवाच्या गर्तेतून? प्रशिक्षण देण्याची व्यक्त केली इच्छा
व्हिडिओ पाहा –