भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 साठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील या पंधरा सदस्यीय संघात अनुभवी फलंदाज व माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला एक वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीनंतर जागा मिळाली. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या सूर्यकुमार यादव याला मात्र संधी मिळाली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
बीसीसीआयने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची घोषणा केली, त्यावेळी त्यात अजिंक्य रहाणेचे नाव पाहून अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. काहींनी आयपीएलच्या कामगिरीच्या जोरावर कसोटी संघात जागा देणे चुकीचे असल्याचे म्हटले. तर, काहींनी अनुभव व फॉर्म याचा संगम साधत त्याला संधी दिल्याचे म्हटले.
रहाणे याला संघात संधी मिळाली असली तरी, सूर्यकुमार यादव याला संधी न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने ट्विट करत लिहिले,
Happy for Rahane. But how does the SKY inclusion-exclusion make sense?? Select kyon kiya…kar liya toh ek match ke baad drop kyon kiya?
— Aakash Chopra (@cricketaakash) April 25, 2023
‘मी अजिंक्यसाठी खुश आहे. मात्र, सूर्याला संधी दिल्यानंतर एकाच सामन्यात खेळवून का बाहेर बसवले?’ सूर्यकुमार याने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून पदार्पण केलेले. या सामन्यात त्याला केवळ 8 धावा करता आल्या होत्या. त्यानंतरच्या तीन सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
डब्ल्यूटीसी अंतिम सामना 7 ते 11 जून यादरम्यान खेळला जाणार आहे. हा सामना इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. मात्र, या सामन्यात जर पावसाने व्यत्यय आणला, तर सामना 12 जून रोजीही खेळवला जाऊ शकतो.
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भारत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट
(Aakash Chopra Make Point Of Exclusion Of Suryakumar Yadav In WTC Final Sqaud Happy For Ajinkya)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मागच्या 10 डावात 11च्या सरासरीने धावा करूनही राहुल खेळणार डब्ल्यूटीसी फायनल! निवडकर्त्यांचा निर्णय कितपत योग्य?
GTvsMI । नाणेफेक जिंकून मुंबईची प्रथम गोलंदाजी, पण महत्वाचा खेळाडू सामन्यात बाहेर