---Advertisement---

टीम इंडियातील ‘हा’ खेळाडू होऊ शकतो भविष्यात चांगला समालोचक

On: मंगळवार, मे 26, 2020 12:28 PM
---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा हा सध्याच्या लोकप्रिय समालोचकांपैकी एक आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आकाशने समालोचनात उतरण्याचा निर्णय घेतला. सध्या तो स्टार स्पोर्ट्सच्या हिंदी समालोचकांपैकी एक प्रमुख समालोचक आहे. एवढेच नाही तर आकाश त्याच्या युट्यूब चॅनेलवरुनही त्याची क्रिकेटबद्दलची मते मांडत असतो.

नुकतेच एका संवादादरम्यान आकाशला एक गमतीशीर प्रश्न विचारण्यात आला. त्याला विचारण्यात आले की सध्याच्या भारतीय क्रिकेटपटूंपैकी कोणामध्ये एक चांगला समालोचक होण्याची क्षमता आह? या प्रश्नाचे उत्तर देताना आकाशने फिरकीपटू आर अश्विनचे नाव घेतले आहे.

आरके शो दरम्यान बोलताना आकाश म्हणाला, ‘रवी अश्विन एक चांगला इंग्लिश समालोचक होऊ शकतो. तो हुशार आणि बुद्धिमान आहे.’

तसेच आकाशने फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप चहल यांना हिंदी समालोचनासाठी निवडले आहे. त्याने म्हटले आहे की चहल आणि कुलदीप यांच्या विनोदी स्वभावाचा यावेळी उपयोग करु शकतात.

आकाश म्हणाला, ‘हिंदीमध्ये युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव मजेशीर ठरतील. कुलदीप अंडर-रेटेड आहे, पण तो सुद्ध विनोदी होऊ शकतो. त्यामुळे कुलदीप माझ्यासाठी डार्क हॉर्स असेल.’

आकाश चोप्राने भारताकडून २००३-०४ दरम्यान १० कसोटी सामने खेळले असून २ अर्धशतकांसह ४३७ धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

फाफ डू प्लेसिसनंतर आता ‘हा’ खेळाडू करणार दक्षिण आफ्रिका कसोटी संघाचे नेतृत्व..?

‘संघसहकाऱ्यांंना वडील हाकलून द्यायचे घराबाहेर; म्हणायचे क्रिकेटमध्ये…’

आयपीएलमधील ‘या’ संघांंना अंतिम सामन्यांत स्विकारावा लागला होता पराभव…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---