भारतीय कसोटी संघाने गेल्या काही वर्षभरात परदेशात जाऊन अतुलनीय प्रदर्शन केले आहे. भारतीय संघाच्या या शानदार प्रदर्शानामध्ये वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा यांसारखे अनुभवी वेगवान गोलंदाज या यशाचे सूत्रधार आहेत. तर मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर या वेगवान गोलंदाजांनीही संधी मिळाल्यावर आपले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.
या वेगवान गोलंदाजांमुळे इतर वेगवान गोलंदाजांना मात्र कसोटी संघात जागा मिळणे कठीण होऊन बसले आहे. या गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याचेही नाव येते. भुवनेश्वर एकेकाळी भारताच्या कसोटी संघाचा अभिवाज्य भाग होता. पण आता तो गेल्या ३ वर्षांपासून भारताच्या कसोटी संघातून (Out From Test Team) बाहेर आहे. आपल्या फिटनेसमुळे त्याला कसोटी संघातून बाहेर राहावे लागले आहे. आता याच भुवनेश्वरबद्दल समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने मोठे वक्तव्य केले आहे.
चोप्राचे असे म्हणणे आहे की, जर भुवनेश्वरने दक्षिण आफ्रिकेत जन्म घेतला (If Bhuvneshwar Was Born In SA) असता तर त्याच्या खात्यात २५० पेक्षा जास्त कसोटी विकेट्स असत्या. चोप्राने यासंबंधी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर एक ट्वीट केले आहे. ‘जर भुवनेश्वर कुमार दक्षिण आफ्रिकेत जन्मला असता, तर त्याने २५० पेक्षा जास्त कसोटी विकेट्ससह आपल्या कारकिर्दीचा शेवट केला असता,’ असे त्याने ट्वीटमध्ये लिहिले आहे.
If Bhuvneshwar Kumar was born in South Africa, he would’ve ended up with 250+ Test wickets.
— Aakash Chopra (@cricketaakash) January 5, 2022
भारताचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) असून तिथे उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स मैदानावर सुरू असून या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज दमदार प्रदर्शन करताना दिसत आहेत. याच सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने एका डावात ७ विकेट्सही घेतल्या आहेत. परंतु भुवनेश्वर या मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नाही. याच पाश्वभूमीवर चोप्राने असे ट्वीट केले असावे.
भुवनेश्वरच्या कसोटी कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने कसोटीत पदार्पण केले होते. परंतु त्याला कसोटीत जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. आतापर्यंत त्याने २१ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. यादरम्यान त्याने ६३ विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८ मध्ये जोहान्सबर्ग येथेच त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहशी वाद घातल्याने दिग्गजाने जेन्सनला खडसावले; करून दिली ‘त्या’ घटनेची आठवण
हेही पाहा-






