---Advertisement---

आयसीसीच्या नव्या टी२० नियमांवर भलताच खूश झाला भारतीय दिग्गज; म्हणाला…

On: शनिवार, जानेवारी 8, 2022 7:50 PM
aus-t20
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) (ICC) नुकतेच टी२० क्रिकेटसाठी दोन नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही नियम टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटविषयी आहेत. यापैकी एक नियम षटकांच्या धीम्या गतीविषयी (स्लो ओव्हर रेट) आणि दुसरा ऐच्छिक ड्रिंक ब्रेकविषयी आहे.  भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (aakash chopra) यांच्यामते आयसीसीने घेतलेले हे निर्णय अगदी योग्य आहेत. स्लो ओव्हर रेटविषयी आयसीसीने घेततेला निर्णय अगदी योग्य आणि खतरणाक आहे, असे आकाश चोप्रा म्हटले आहेत. त्यांच्यामते षटकांची गती न राखण्यासाठी यापेक्षा मोठी शिक्षा असू शकत नाही.

आयसीसीने घेतलेले हे दोन निर्णय चालू महिन्यापासून लागू करण्यात आले आहेत. जर एखादा संघ ठरलेल्या वेळेत त्यांची संपूर्ण षटके टाकू शकला नाही तर, त्यानंतर या संघाचा ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेरचा एक खेळाडू कमी करण्यात येईल. टी२० क्रिकेटमध्ये पावर प्ले संपल्यानंतर प्रत्येक संघ ३० यार्डच्या बाहेर पाच खेळाडूंना ठेऊ शकतो. मात्र, आता जर एखादा संघ मर्यादित वेळेत त्यांची षटके टाकू शकला नाही, तर त्यांचे चार खेळाडूच या वर्तुळाच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकतील. इतर सर्व खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभे असतील.

स्लो ओवर रेटविषयीचा नवीन नियम खूपच चांगला

भारतीय संघामे माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा यांनी आयसीसीच्या या निर्णयाचे कौतुक केले. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाले की, “आयसीसीने सांगितले आहे की, स्लो ओवर रेटवर खूप मोठी शिक्षा मिळेल. माझ्यामते, यापेक्षा मोठी शिक्षा दुसरी  कोणतीच असू शकत नाही. इतर सर्व शिक्षांना काहीच अर्थ नाहीये. तुम्ही कर्णधारावर बंदी घाला किंवा आयपीएल संघावर आर्धिक दंड लावा, सामन्यासाठी मिळणारे शुल्क कापा, याला काहीच अर्थ नाही. या नवीन नियमाची खासियत ही आहे की, जर तुम्ही चूक केली, तर त्याची शिक्षा तुम्हाला तात्काळ मिळणार. आता खेळाडू लवकर षटके संपवण्याचा प्रयत्न करतील. माझ्या मते हा एक खूपच चांगला नियम आहे.”

महत्वाच्या बातम्या –

इमर्जन्सीमध्ये यष्टिरक्षणाला उतरला आणि केली विश्वविक्रमाची बरोबरी! ओली पोपचा कारनामा

बटलर-बेअरस्टोसारखे यष्टीरक्षक संघात असताना पोपला करावे लागले यष्टीरक्षण; ‘हे’ आहे कारण

क्रिकेटवेड्या एल्गरने बालपणी मुख्याध्यापकांना म्हटले होते असे काही की सरकलेली त्यांच्या पायाखालची जमीन

व्हिडिओ पाहा –

टोकियो ऑलिम्पिक... भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा | India at Tokyo Olympics 2020

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---