माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंहबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आकाश चोप्रांच्या मते रिंकूला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवून टीम मॅनेजमेंट मोठी चूक करत आहे. चोप्रा म्हणाले की, रिंकूला थोड्या वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायला पाहिजे, जेणेकरून त्याला जास्तीत जास्त धावा करण्याची संधी मिळेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात रिंकू सिंहला खूपच खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आलं होतं. परिणामी तो केवळ 11 धावाच करू शकला. अलीकडच्या काही टी20 सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, रिंकू सिंहला फलंदाजीत जास्त काही करण्याची संधी मिळालेली नाही. त्यानं आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 500च्या जवळपास धावा केल्या आहेत.
आकाश चोप्रा त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले, रिंकू सिंहसोबत आपण बरोबर करत आहोत का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मी हा प्रश्न का विचारत आहे? तुम्ही त्याला प्रथम संघात ठेवलं. तो तुमचा पसंतीचा खेळाडू आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत आणि त्याआधीही तो संघासोबत होता. जेव्हाही तुम्ही त्याला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवलं किंवा पॉवरप्लेमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली, तेव्हा त्यानं नेहमीच धावा केल्या आहेत. त्यानं जवळपास सर्वच वेळा अर्धशतकं झळकावली. तो संकटात नेहमीच तुमच्या सोबत उभा राहिला आहे.”
आकाश चोप्रा पुढे बोलताना म्हणाले, तुमच्याकडे या सामन्यात त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची संधी होती. मात्र तुम्ही असं केलं नाही. रिंकू सिंहला तुम्ही नेहमीच सहाव्या क्रमांकावर पाठवण्याचं कारण काय? मी हा प्रश्न विचारत आहे कारण रिंकू सिंह सामने फिनिश करू शकतो. परंतु तो फक्त फिनिशर नाही.
हेही वाचा –
टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम भारताच्या नावे, आजपर्यंत असं कोणताही संघ करू शकलेला नाही!
भारताचा व्हाईटवॉश! ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध ऋतुराज ब्रिगेडचा दारुण पराभव
टीम इंडियात फूट? गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात एकमत नाही! अहवालात धक्कादायक खुलासा