इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला एजबेस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात विजयाच्या अगदी जवळ पोहोचून हार पत्करावी लागली. भारतीय संघाकडे टी-20 आणि वनडे मालिकेच्या माध्यमातून या पराभवाचा वचपा काढण्यास पुरेसे सामने आहेत. भारत आणि इंग्लंडमध्ये गुरुवार, 7 जुलैपासून टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत 3 सामने होतील. या मालिकेतून रोहित शर्मा याचे संघात पुनरागमन होईल. मात्र रोहितचे पुनरागमन झाल्यास आता कोण बाहेर पडणार? असे प्रश्न विचारले जात आहेत.
टी20 मालिकेनंतर दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेसाठी एकमेकांविरुद्ध उभे राहतील. टी20 आणि वनडे मालिका मिळून भारत आणि इंग्लंडदरम्यान 10 दिवसात एकूण 6 सामने खेळले जातील. पाचव्या कसोटी सामन्यातील पराभवामुळे भारतीय क्रिकेटप्रेमी थोडे निराश आहेत. मात्र त्यांच्यात आगामी मर्यादित षटकांच्या मालिकांबद्दल उत्सुकता आहे. दिग्गज समालोचक आणि माजी कसोटी क्रिकेटर आकाश चोप्राने आपला ऑनलाइन शो ‘आकाशवाणी’मध्ये कसोटी सामन्यामध्ये भारताच्या पराभवाचे कारण आणि WTC च्या अंतिम सामन्यामध्ये क्वॉलिफिकेशनचा उल्लेख करत रोहित शर्माच्या पुनरागमनाबाबत उत्सुक असल्याचेही सांगितले आहे.
‘आकाशवाणी’मध्ये चोप्राने विचारले प्रश्न
कसा आणि का हारला भारत? आता WTC च्या अंतिम सामन्यातील पात्रतेचे काय? ऐका आणि बघा आजच्या #AakashVani सह. अशी एक ‘कू’ पोस्ट शेयर करत आकाशने इंग्लंडच्या ताकतवान फलंदाजी फळीचेही कौतुक केले आहे. सोबतच भारतीय गोलंदाजांना धडा घेण्याचा सल्लाही दिला आहे.
आपल्या अजून एका पोस्टमध्ये त्याने आगामी मालिकेचा उल्लेख करत लिहिले, “रोहितचे टी20 साठी पुनरागमन झाले आहे. आता बाहेर कोण जाणार? ऋतुराजला नाही मिळणार दुसरी संधी, पण संजू आपली जागा कायम ठेवणार का? हुड्डाचे काय? उद्या जेव्हा भारत जोस बटलरच्या इंग्लंडसोबत टक्कर घेईल तेव्हा खूप उत्तरं मिळतील. आता मी वाट नाही पाहू शकत.”
रात्री उशिरा सुरू होईल सामना
भारत आणि इंग्लंडमधले आगामी सामने 7 जुलैपासून 17 जुलैपर्यंत वनडे आणि टी२० सामने खेळले जातील. म्हणजे, दोन्ही संघांमध्ये पुढच्या 11 दिवसात 6 सामने होतील. पहिला टी20 सामना साउथैंप्टनमध्ये खेळला जाईल. हा डे-नाइट सामना असेल, जो रात्री 10.30 (भारतीय वेळ) वाजता सुरू होईल. म्हणजेच, भारतात या सामन्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला नक्कीच झोप खराब करावी लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला अन्याय बिल्कुल आवडत नाही’, वॉर्नरच्या पत्नीचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर मोठे विधान
भारताविरुद्ध जो रुट, बेन स्टोक्सने केलेलं पिंकी फिंगर सेलेब्रेशन नेमके काय? वाचा सविस्तर