Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी सलामीवीराने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’; चार भारतीयांना मिळाली जागा

आकाश चोप्रा यांनी वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ निवडला आहे.

December 13, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
india gaba test win

Photo Courtesy: Twitter/ICC


अखेरीस आलेल्या २०२१ वर्षात अनेक मनोरंजक क्रिकेट सामने आणि मालिका पाहायला मिळाल्या. यावर्षी आयसीसी टी२० विश्वचषक देखील खेळला गेला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले. अनेक खेळाडूंनी या संपूर्ण वर्षात अप्रतिम खेळ दाखवला आहे. अशात भारतीय संघाचे माजी खेळाडू आकाश चोप्रा (aakash chopra) यांनी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात त्यांचा यावर्षीचा सर्वोत्कृष्ट कसोटी संघ निवडला आहे. यामध्ये विशेष गोष्ट ही आहे की, त्यांनी या संघात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला स्थान दिलेले नाही.

त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आकाश यांनी यावर्षीच्या सर्वोत्तम कसोटी संघाची निवड केली आहे. त्यांनी या संघाचे कर्णधारपद न्यूझीलंडचा नेतृत्व करणाऱ्या केन विलियम्सनकडे सोपवले आहे. सलामीवीर फलंदाजाच्या रूपात आकाशने भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा आणि श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने यांची निवड केली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आकाश यांनी इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटला निवडले आहे. रुटने या संपूर्ण वर्षांत इंग्लंड संघासाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनची निवड केली आहे. तो आकाश यांच्या या संघाचा देखील कर्णधार असेल. त्यानंतर, त्यांनी पाकिस्तान संघाचा फवाद आलम याला देखील निवडले आहे. फवादने पाकिस्तानसाठी सर्वाधिक वेगवान पाच शतक करण्याच विक्रम केला होता. फवादने अवघ्या २२ डावांमध्ये त्याचे पाचवे शतक केले होते.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेल्या अप्रतिम प्रदर्शनामुळे आकाश यांनी त्याला स्वतःच्या संघात देखील यष्टीरक्षक फलंदाजाच्या रूपात संधी दिली आहे. पंतने यावर्षी ४१.५२ च्या उत्कृष्ट सरासरीने ७०६ धावा केल्या आहेत. त्यानंतर आकाशने न्यूझीलंडच्या कायले जेमिसनला निवडले. या संघात दोन फिरकी गोलंदाजांच्या रूपात रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांना संधी दिली. तसेच वेगवना गोलंदाजांच्या रूपात इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि शाहीन शाह अफ्रिदी यांची निवड केली आहे.

आकाश चोप्रा यांनी निवडलेला यावर्षीचा सर्वोत्तम कसोटी संघ –

रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने, जो रुट, केन विलियम्सन (कर्णधार), फवाद आलम, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कायले जेमिसन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जेम्स अँडरसन आणि शाहीन अफ्रिदी.

महत्वाच्या बातम्या –

शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “तो माझ्या कार्यकाळातील सर्वात वाईट दिवस”

बिग ब्रेकिंग: रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ‘आऊट’; युवा सलामीवीराची लागली लॉटरी

‘ऋतूराजला आता टीममध्ये घ्या, २८व्या वर्षी घेऊन काय करणार?’ ‘या’ दिग्गजाचा मोलाचा सल्ला


Next Post
Gaby-Lewis

'अरे माझ्या कॉलेजच्या नोट्सही त्यातच राहिल्या...', विमानात सामान विसरलेल्या क्रिकेटपटूचं आयसीसीकडे गाऱ्हाणं

south africa team

भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाची आपल्याच संघसहकाऱ्यांना चेतावणी; म्हणाला...

wriddhiman-saha

चिंतेचा डोंगर डोक्यावर घेऊन साहा खेळला न्यूझीलंडविरुद्धची मालिका; वाचा काय घडलेले

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143