आगामी आशिया चषका स्पर्धेची सुरुवात २७ ऑगस्टपासून होणार आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याने आशिया चषक सुरू होईल. भारतीय संघाच्या अभियानाची सुरुवात २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून होईल. बीसीसीआयने सोमवारी (८ ऑगस्ट) आशिया चषकासाठी १५ सदस्यीय संघ घोषित केला. भारताचा मोजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने आता या १५ सदस्यीय संघातून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने पाकिस्ताविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही प्रमुख खेळाडूंना संधी मिळाली नाहीये. त्याच्या मते रविंचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक आणि आवेश खान या खेळाडूंना स्पर्धेतील पहिल्या टी-२० सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही. दुसरीकडे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल या प्रमुख गोलंदाजांना दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.
प्लेइंग इलेव्हनविषयी बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मासोबत केएल राहुल येईल. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. त्यानंतर डावे-उजवे कॉम्बिनेशन राखण्यासाठी चोप्राने चौथ्या क्रमांकावर रिषभ पंत याची निवड केली आहे. पाचव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची निवड केली गेली आहे.
त्यानंतर हार्दिक पंड्या आणि दीपक हुड्डा यांची भूमिकाही त्याने स्पष्ट केली. आकाश चोप्राच्या मते केएल राहुल आणि विराट हे दोघेही मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन करणार आहेत. अशात संघाचे वरची फळी अपयशी ठरली, तर नंतरच्या फलंदाजांवर अधिकची जबाबदारी येऊ शकते. फलंदाजीत अधिक खोली आणण्यासाठी चोप्राने दिनेश कार्तिकच्या जागी दीपक हुड्डाला निवडले आहे. गोलंदाजांमध्ये त्याने रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.
आकाश चोप्राने निवडलेली प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुड्डा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
घरच्या लग्नात फेटा घालून सहभागी झाला मास्टर ब्लास्टर, साराच्या लूकवरही नेटकरी फिदा
भारतासाठी धोक्याची घंटा! झिम्बाब्वेच्या कर्णधाराचे १४ वर्षांत पहिलेच शतक, षटकार-चौकारांचा पाडला पाऊस
ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाच्या ४ वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराचा क्रिकेटपासून दूर राहण्याचा मोठा निर्णय