क्रिकेटटॉप बातम्या

“150 किलोपेक्षा जास्त सामानाची गरज…”, भारतीय खेळाडूंवर आकाश चोप्राची बोचरी टीका

बाॅर्डर गावस्कर मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) खेळाडूंवर विविध निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये खेळाडूंबाबत अनेक बंधने आहेत. ज्यातील एका बंधनावर माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे. ज्याद्वारे त्याने भारतीय खेळाडूंवर बोचरी टीका केली आहे. खरं तर बीसीसीआयने, खेळाडूंवर असे बंधन घालण्याची योजना आखली आहे की जर खेळाडूंनी विमानात 150 किलोपेक्षा जास्त सामान वाहून नेले तर त्यांना त्याचा खर्च स्वतः करावा लागेल.

बीसीसीआयच्या या निर्णयावर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने खेळाडूंवर टीका केली आहे. आकाश चोप्राने याबद्दल बोलताना सोशल मीडियावर पोस्ट करत लिहले की, “क्रिकेट दौऱ्यावर कुणालाही 150 किलोपेक्षा जास्त सामानाची गरज का भासते? क्रिकेट किट-बॅग साधारण 40 किलोची असते. त्यानंतर 15 बॅट जरी घेतलात तरी त्याचे वजन 20 किलोपेक्षा जास्त नाही होणार, मग 150 किलो मध्ये तुम्ही नेमकं असं काय घेऊन जाता. बोर्डाचे बरोबर आहे 150 किलो पेक्षा जास्त वजन असले तर त्याचे आधिक खर्च बीसीसीआयने का द्यावे?” अशाप्रकारे माजी क्रिकेटपटूने खेळाडूंना खडेबोल सुनावले आहे.

याशिवाय, बीसीसीआयच्या आढावा बैठकीत काही मोठे निर्णय झाल्याचे वृत्त समोर आले आहेत. ज्यामध्ये खेळाडूंची चांगली कामगिरी नसल्यास त्यांच्या पगारातून कपात केली जाईल. असा निर्णय घेण्यात आला. ज्याचा उद्देश असा असेल की खेळाडूंना त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी जबाबदार राहावे लागणार आहे. कामगिरीत कमीपणा जाणवला तर पगारात पण कमीपणा जाणवेल. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा-

स्मृती मंधानाचं नाव इतिहासात अजरामर! भारतासाठी हा मोठा रेकॉर्ड मोडला
रणजी ट्रॉफीमध्ये विराट कोहलीची बॅट आग ओकते, आकडेवारी पाहून व्हाल थक्कं!
मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानात जाणार

Related Articles