---Advertisement---

“विराट, धोनी व रोहित प्रमाणेच डिव्हिलियर्सलाही मिळते भारतीय चाहत्यांकडून प्रेम”, पाहा कोण म्हणतंय असं

On: शुक्रवार, मे 21, 2021 8:21 PM
AB de Villiers
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स सध्या चर्चेत आहे. मागील अनेक दिवसांपासून त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची चर्चा होती. मात्र, त्याने तो निवृत्तीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट करत या चर्चांना पुर्णविराम लावला. आता त्याच्याबद्दल भारताचे माजी क्रिकेट खेळाडू व वर्तमान समालोचक आकाश चोप्रा यांनी नुकतीच एक प्रतिक्रिया दिली आहे.

चोप्रा म्हणाले, की भारतात विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्याप्रमाणेच एबी डिव्हिलियर्सलाही लोक तितकेच पसंद करतात. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा यांनी एका घटनेचा संदर्भ दिला आहे, जेव्हा भारतीय प्रेक्षकांनी उभे राहून डिव्हिलियर्सचे कौतुक केले होते.

चोप्रा म्हणाले, “भारतीय क्रिकेट संघाकडे नजर टाकल्यास धोनी, कोहली आणि रोहित असे तीन खेळाडू आहेत, ज्यांच्या आगमनाने मैदानात प्रेक्षक आवाज उठवितात. मी पाहिले आहे की अशाच प्रकारे एबी डिव्हिलियर्सला देखील लोकांनी अभिवादन केले होते. जणू तो भारतीय खेळाडूच आहे. भारतीय लोकांच्या हृदयात डिव्हिलियर्ससाठी एक विशेष स्थान आहे. असे बरेच क्षण आहेत जे आपल्याला नेहमीच लक्षात राहतात. धरमशाला येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यादरम्यान अशीच एक घटना घडली होती.”

आकाश चोप्रा यांनी ज्या टी20 सामन्याचा उल्लेख केला आहे, त्यात एबी डिव्हिलियर्सने अवघ्या 32 चेंडूत आक्रमक 51 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने 200 धावांचे लक्ष्य 7 विकेट शिल्लक ठेवत पार केले होते.

दरम्यान आयपीएल 2021 स्पर्धा रद्द झाल्यामुळे प्रेक्षकांना डिव्हिलियर्सला मैदानात आक्रमक फटके खेळताना बघण्याची मोठी संधी हुकली. आयपीएल 2021 मध्ये डिव्हिलियर्स शानदार फॉर्ममध्ये होता व सर्व क्रिकेट प्रेमींना आशा असेल की लवकरच ही स्पर्धा पुन्हा सुरू व्हावी, ज्यामुळे त्यांना डिव्हिलियर्सला पुन्हा एकदा मैदानात खेळताना बघायला मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ भारतीय क्रिकेटपटूची कमाल; टी१० सामन्यांत एकाच षटकात ठोकले सलग ६ षटकार 

मॅराडोना यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हेतर हत्या? जवळच्या लोकांवर संशय

‘धवन श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधार असावा’, युवा वेगवान गोलंदाजाने कारणासहीत केली शिफारस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---