भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा मागील जवळपास सहा महिन्यांपासून भारतीय संघासाठी क्रिकेट खेळला नाही. पाठीच्या दुखापतीमुळे आशिया चषक व टी20 विश्वचषक या महत्त्वाच्या स्पर्धा तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर आता सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत तसेच आगामी वनडे मालिकेत देखील तो सहभागी होणार नाही. मात्र, पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या आयपीएलमध्ये तो खेळताना दिसेल. याच मुद्द्यावर आता भारताचा माजी सलामीवीर व प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने आपले मत व्यक्त केले आहे.
बुमराह भारतासाठी जास्त न खेळता पूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध असल्याने चाहते व समीक्षक त्याच्यावर टीका करत आहेत. बुमराह देशापेक्षा पैशाला अधिक महत्त्व देत असल्याचा आरोप काही जण करतात. या मुद्द्यावर बोलताना आकाश चोप्रा याने आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये मत मांडले. तो म्हणाला,
“बुमराहला अद्याप राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र भेटलेले नाही. तो तंदुरुस्त असता तरी मी त्याला या मालिकेत खेळवले नसते. कारण, सध्या संघ उत्कृष्ट कामगिरी करतोय. तो भारताचा प्रमुख खेळाडू आहे त्यामुळे त्याला विश्रांती देणे गरजेचे वाटते. मी त्याला थेट जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळवले असते.”
तो पुढे बोलताना म्हणाला,
“अनेकजण तो आयपीएलसाठी तंदुरुस्त होणार असल्याच्या मुद्द्यावर टीका करत आहेत. मात्र, बीसीसीआय व त्याची फ्रेंचाईजी यामध्ये समन्वय साधला जाईल. कोणतीही फ्रेंचाइजी असाच विचार करेल की, खेळाडू आधी देशाचा आहे आणि त्यानंतर फ्रेंचाईजीचा. मग ती फ्रॅंचाईजी चेन्नई सुपर किंग्स असो किंवा मुंबई इंडियन्स.”
चोप्रा हा मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. केएल राहुल यांच्या मुद्द्यावर चोप्रा व माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांच्या दरम्यान ट्विटर वॉर चांगलेच रंगलेले.
(Aakash Chopra Said Every Franchise Thik Country First Then His Team About Jasprit Bumrah)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! सेमीफायनलपूर्वीच टीम इंडियाला झटका, दोन प्रमुख खेळाडू एकाचवेळी बाहेर
ब्रेकिंग! टीम इंडियातील मराठमोळ्या क्रिकेटपटूवर कोसळला दुःखाचा डोंगर, सर्वकाही सोडून थेट घरी परतला