भारतीय संघाचा युवा फलंदाज संजू सॅमसन याच्याबाबत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जर केएल राहुल तंदुरुस्त झाला तर, सॅमसनला विश्वचषक तसेच आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळणार नाही, असे तो म्हणाला. त्याच्या म्हणण्यानुसार, केएल राहुल उपलब्ध नसेल तर त्याला दोन्ही संघात संजूला स्थान मिळण्याची शक्यता आहे.
सॅमसनची वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेदरम्यान चांगली कामगिरी करता आलेली नाही. वनडे मालिकेतील एक अर्धशतक सोडल्यास उर्वरित सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. अशा स्थितीत त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे, केएल राहुलबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या दुखापतीतून सावरत असून, बेंगलोर येथील एनसीएमध्ये तयारी करत आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना तो म्हणाला,
“जर केएल राहुल उपलब्ध असेल तर मला संजू सॅमसन विश्वचषकाच्या संघात दिसत नाही. तसेच मला तो आशिया चषक संघात सहभागी देखील झालेला दिसत नाही. मात्र, केएल राहुल तंदुरुस्त नसल्यास, कदाचित आशिया कप आणि विश्वचषक संघातही त्याचा समावेश केला जाऊ शकतो. केएल राहुल उपलब्ध आहे की नाही यावर सर्वकाही अवलंबून आहे.”
याआधी माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेलने संजू सॅमसनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तो म्हणाला की, जेव्हा जेव्हा संजू सॅमसन संघात नसतो तेव्हा आपण त्याच्याबद्दल खूप बोलतो की त्याला संधी मिळायला हवी होती. मात्र, त्याने मिळालेल्या संधींचा फायदा घेतला नाही.
(Aakash Chopra Said Sanju Samson Will Not Part Of Asia Cup And World Cup If KL Rahul Fit)
महत्वाच्या बातम्या –
मोहम्मद आमिर संघात परतणार का? वर्ल्डकप 2023 पूर्वी पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी केले मोठे वक्तव्य
विश्वचषकात शिखर धवन पार पाडू शकतो प्रमुख भूमिका, आकडेवारी वाचून कळेल महत्व