अलीकडेच भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा केली. पण अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा त्यात समावेश करण्यात आला नाही. आता माजी खेळाडू आकाश चोप्रा याने या दोघांबाबत मोठे वक्तव्य केले असून त्याच्या मते, भारतासाठी पुजारा आणि रहाणे यांची कसोटी कारकीर्द आता संपली आहे.
12 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात युवा खेळाडूंवर दाखविलेला विश्वास कायम ठेवण्यात आला असून नुकतेच रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावणारा चेतेश्वर पुजारा,(Cheteshwar Pujara) तसेच अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांची निवड करण्यात आलेली नाही. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही या दोघांना कसोटी संघाबाहेर ठेवण्यात आले होते. (aakash chopra says cheteshwar pujara and ajinkya rahane s chapters in indian test side have been closed)
या दोघांपैकी एकाला घरच्या मालिकेत संधी मिळेल, अशी आशा असली तरी निवडकर्त्यांनी आता तरुणांकडे मोर्चा वळवला आहे. पुजाराने अखेरचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते, तर रहाणेची वेस्ट इंडिज दौऱ्यापासून निवड झालेली नाही.
आकाश चोप्रा (Akash Chopra) त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “संघ अपेक्षेप्रमाणे आहे. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा नसतील अशी आम्हाला अपेक्षा होती. मला वाटते त्यांचा अध्याय संपला आहे. जर तुम्ही त्यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडले नव्हते, तर त्यांना निवडण्याची ही शेवटची संधी होती. तुम्ही त्यांना तेथे निवडले नसल्यास, तुम्ही त्यांच्याकडे परत जाणार नाही.”
चोप्राने पुजाराबद्दल पुढे बोलताना सांगितले की, तो धावा करत राहीन कारण त्याला फलंदाजी आवडते आणि तो 100 प्रथम श्रेणी शतके देखील करू शकतो. तो पुढे म्हणाला, “पुजाराने गेल्या आठवड्यात द्विशतक झळकावले होते. तो क्रिकेटचा संत आहे. तो धावा करत राहील कारण तो फक्त निवडीसाठी धावा करत नाही. निम्मे जग निवडीसाठी धावा करतात. फलंदाजीची आवड असल्यानेच तो क्रिकेट खेळतो. त्याला धावा करायला आवडतात म्हणून तो धावा करतो. त्यामुळे पुजारा धावा करत राहील आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्व विक्रम मोडेल. मला वाटते की, त्याने आतापर्यंत 61 प्रथम श्रेणी शतके झळकावली आहेत आणि 100 शतके ठोकेल. तो थांबणार नाही. तो अजिबात निवृत्त होणार नाही.” (Pujara-Rahane’s Test career is over ex-player’s big statement about the legendary batsman)
हेही वाचा
IND vs AFG । होळकर स्टेडियमवर जयस्वालचा धमाका आणि दुबेचं वादळ! टी-20 मालिका भारताच्या खिशात
भारतासाठी ‘या’ दोघांनी ठोकली सर्वात वेगवान T20I शतकं, दोघांनी काढला श्रीलंकन गोलंदाजांचा घाम