---Advertisement---

सूर्यकुमार यादवने दाखवली कमाल, भारताचा माजी दिग्गज म्हणाला हा तर ‘मिस्टर 360 डिग्री’

Suryakumar-Yadav
---Advertisement---

भारताने इंग्लंडविरुद्धची टी20 सीरीज तडाखेबंदपणे आपल्या नावे करून घेतली आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या टी20 सामन्यात भारत 17 धावांनी पराभूत झाला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने (SuryaKumar Yadav) उत्कृष्ट खेळी केली. मात्र एक मोठे रेकॉर्ड बनवायला त्याला केवळ एक धाव कमी पडली. त्याने सामन्यात केवळ एक धाव अजून काढली असतो तर त्याला भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चा रेकॉर्ड तोडता आला असता.

नेमके कुठले रेकॉर्ड हुकले?

सूर्यकुमार यादवने कठीण काळात इंग्लंडच्या संघावर काउंटरअटॅक केला आणि तिसऱ्या टी20 सामन्यात 55 चेंडूवर 117 धावांची शानदार शतकी खेळी केली. यात त्याने 14 चौकार आणि 6 षटकार लावले. त्याची ही खेळी पाहून असे वाटत होते, की टीम इंडिया हा सामना आपल्या नावे करू शकते. भारतातर्फे टी20 क्रिकेटमध्ये हे रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध 43 चेंडूमध्ये 118 धावा काढल्या होत्या.

भारताच्या खेळीला सांभाळले

इंग्लंडने तिसऱ्या टी20 सामन्यात भारताला 216 धावांचे लक्ष्य दिले होते. याच्यानंतर खेळताना भारताचे आघाडीचे तीनफलंदाज लवकरच पराभूत झाले. यानंतर सूर्यकुमार यादवने धावा काढण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि मैदानात उतरला. त्याची कालची फलंदाजी पाहूनही माजी क्रिकेटर आकाश चोप्राने सोशल मीडिया प्लेटफार्म कू ऐप (Koo App) वर त्याचे कौतुक केले आहे. आकाश लिहितो, की सूर्यकुमार यादवच्या खेळीने काल जी कमाल दाखवली, त्यातून वाटते, त्याला खेळाची मोठीच समज आहे. त्याला माहित होते, गोलंदाज त्याच्यावर कशाप्रकारे आक्रमण करेल. त्याच्या या खेळाला पाहून मला तर तो मिस्टर 360 डिग्रीच वाटला.

 

याआधीही सामन्याची समीक्षा करताना चोप्राने मन भरून यादव यांचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘सूर्यकुमार यादवने शतक झळकावले. टी20 मध्ये शतक पूर्ण करणे हे माउंट एवरेस्ट चढण्यासारखे आहे.’

क्रिकेटर ते कमेंटेटर असा प्रवास केलेला आकाश चोप्रा म्हणाला, की दुखापतीतून सावरल्यावर अजून एकदा सूर्यकुमारने आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. चोप्रा म्हणाला, ‘सूर्यकुमार काही दुखापतींमधून सावरल्यावर पुनरागमन करतो आहे. त्याला इथे खेळायची संधी मिळाली. मागचे दोन तीन सामने तितकेसे चांगले नव्हते. मात्र आता पुन्हा एकदा त्याने आपली उपयोगिता आणि ताकद दाखवली आहे.’

यादव साउथ अफ्रीकेच्या घरच्या सीरीजमध्ये खेळले नव्हते. आईपीएल 2022 च्यादरम्यान झालेल्या जखमेने त्यांला सिरीजपासून दूर ठेवले. आयर्लंडच्याविरुद्ध टी20 सीरीजवेळी तो चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. मात्र इंग्लंडविरुद्ध पहिल्या 2 टी20 सामन्यांमध्येही त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. रविवारी मात्र त्याने तडाखेबाज शतक लावले.

 

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंकेचा डावाने दमदार विजय, ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का; तब्बल १२ विकेट्सह पदार्पणात चमकला जयसूर्या

इंग्लंडची झोप उडवणाऱ्या सूर्यकुमारलाच लागेना झोप! पत्नीने केला रात्रीचा व्हिडिओ शेअर

वय केवळ आकडाच! ९४ वर्षाच्या भारतीय आजीबाईंचा परदेशात पराक्रम, सोनेरी यशासह मिळवली तीन पदकं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---