इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला पराभवा पत्करावा लागाल. परंत सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीसाठी त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये हे त्याचे पहिले शतक होते, तर भारतीय संघासाठी अशी कामगिरी करणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. शतक पूर्ण केल्यावर सूर्यकुमारला त्याच्या शतकाचा जल्लोष करता आला नाही. परंतु रात्री त्याच्या पत्नीसोबत तो सामन्याचे हायलाईट्स पाहताना दिसला.
भारतीय संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात २१ धावांची आवश्यकता होती. परंतु त्यावेळी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) खेळपट्टीवर नसल्यामुळे संघाला पराभव मिळाला. १९ व्या षटकात मोईन अलीने सूर्यकुमारची विकेट घेतली आणि एकप्रकारे सामनाच खिशात घातला. सामना गमावल्यामुळे त्याला स्वतःच्या शतकाचा जल्लोषही करता आला नाही. परंतु सामना संपल्यानंतर रात्री पत्नी देविशा शेट्टीने सूर्यकुमारचे काही खास फोटो शेअर केले.
सूर्यकुमारने सामन्यातील शतकाचा आनंद पत्नी देविशासोबत साजरा केला. देविशाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार त्याच्या शतकाच्या हायलाईट्स पाहत आहे. देविशाने तिच्या इंस्टा स्टोरीवर दुसरेही काही फोटो शेअर केले आहेत.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडचा कर्णधार जॉनी बेयरस्टोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाज अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत, पण सूर्यकुमारच्या शतकीय फलंदाजीच्या जोरावर संघ १९८ धावांपर्यंत मजल मारू शकला.
सूर्यकुमारने या सामन्यात एकूण ५५ चेंडू खेळले आणि ११७ धावा केल्या. दुर्दैवाने तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहू शकला नाही. शेवटच्या षटकात जर सूर्यकुमार खेळपट्टीवर असता, तर तो संघाला विजय मिळवून देऊ शकत होता. श्रेयस अय्यरने या सामन्यात २८ धावा केल्या. दुसरा एकही भारतीय फलंदाज ११ धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सूर्याने शतक तर झळकावलंच, पण त्याच्या ‘या’ षटकाराने वेधलं लक्ष, व्हिडिओ तुफान व्हायरल
सूर्यकुमारच्या शतकी खेळीनंतर भारताच्या आजीमाजी खेळाडूंची टिवटिव; सचिनही झाला स्कायचा ‘फॅन’
श्रीलंकेला लागला मोठा झटका, जबरदस्त फॉर्मात असलेला खेळाडू मालिकेबाहेर