इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला १७ धावांनी पराभव स्विकारावा लागला. विजयासाठी भारताला २१६ धावांची आवश्यकता होती, पण संघ ९ विकेट्सच्या नुकसानावर १९८ धावांपर्यंत मजल मारू शकला. एकट्या सूर्यकुमार यादव याच्या जोरावर भारताला इथपर्यंत पोहोचता आले. सूर्यकुमारने केलेल्या शतकी खेळीसाठी अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे. यामध्ये भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या सामन्यात एकूण ५५ चेंडू खेळला, ज्यामध्ये १४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ११७ धावा केल्या. त्याने अवघ्या ४८ चेंडूत शतक पूर्ण केले. सूर्यकुमारव्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज ३० धावांपर्यंत मजल मारू शकला नाही. तो १९ व्या षटकात बाद झाल्यामुळे, संघ लक्ष्य गाठू शकला नाही. परंतु त्याच्या शतकानंतर अनेक दिग्गज सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.
माजी दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने देखील सूर्यकुमारचे कौतुक करणारे ट्वीट केले आहे. सचिनने अधिकृत ट्वीटर खात्यावरून केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “कमालीचे शतक केले सूर्यकुमार यादव. तू अनेक उत्कृष्ट शॉट्स खेळले, त्यातील पॉइंटच्या वरून ते स्कूप करून मारलेले षटकार अप्रतिम होते.”
https://twitter.com/sachin_rt/status/1546177383559901187?s=20&t=_9XB1QMiNz9UhwK4X3045A
भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने ट्वीट केले की, “सूर्या रविवारी चमकला. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये शतक ठोकणारा पाचवा भारतीय , तुला माझा सलाम आहे सूर्यकुमार यादव. तू याचा हकदार आहे. ”
https://twitter.com/MishiAmit/status/1546176625942749186?s=20&t=2K2mbYcTDYW5Lu8vPVMmIg
भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने ट्वीट केले की, “सूर्यकुमार यादव. सर्वकडे शॉट्स मारणारा उत्कृष्ट फलंदाज.”
https://twitter.com/IrfanPathan/status/1546181198166228993?s=20&t=cIcE5nvXFhrhnrdCT_OykQ
माजी दिग्गज सुरेश रैनाने भारतीय संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये पहिले शतक ठोकले होते. भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये शतक करणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये रैनाने सुर्यकुमारचे स्वागत केले आहे. त्याने लिहिले की, “हंड्रेड क्लबमध्ये स्वागत आहे. खूप चांगला खेळलास भावा.”
https://twitter.com/ImRaina/status/1546186735004033024?s=20&t=Er321AIBPVosqY18Ua_c1A
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ७ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ९ विकेट्सच्या नुकसानावर १९८ धावा करू शकला. इंग्लंडने १७ धावांनी हा सामना जिंकला. परंतु १-२ अशा अंतराने यजमानांना टी-२० मालिकेत पराभव स्वीकारावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी२०मध्ये शंभरी करण्यात भारताचेच खेळाडू वरचढ, पाहा किती केली शतके
इंग्लंडने रोखला ‘रोहितसेने’चा विजयीरथ अन् ‘हिटमॅन’ची हुकली पाँटिंगचा विश्वविक्रम गाठण्याची संधी
टी२०त सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जिंकणारा भुवनेश्वर दुसरा भारतीय, पाहा अव्वलस्थानी कोण






