वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (दि. 12 जुलै) डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर पहिल्या कसोटीला सुरुवात झाली. या सामन्यातून यशस्वी जयस्वाल व ईशान किशन या दोन भारतीय युवा खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले. त्याचवेळी या सामन्यात भारताचा नियमित सलामीवीर शुबमन गिल हा प्रथमच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. मात्र, संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाने भारताचा माजी सलामीवीर व समालोचक आकाश चोप्रा काहीसा हैराण झालेला दिसला.
या सामन्यात भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून कर्णधार रोहित शर्मा व युवा यशस्वी जयस्वाल उतरणार हे यापूर्वी स्पष्ट करण्यात आलेले. त्यामुळे नियमित सलामीवीर गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितलेले. मात्र, याच निर्णयावर आश्चर्य व्यक्त करताना चोप्रा आपल्या यु ट्युब चॅनलवर बोलताना म्हणाला,
“हे खरोखरच मोठी गोष्ट आहे की, गेल्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि संघ व्यवस्थापनाने ती लगेच मान्य केली. त्याने भारतासाठी अत्यंत थोडे सामने खेळले असतानाही त्याची ही विनंती मान्य झाली. आमच्या वेळी अशी परिस्थिती नव्हती. ही त्याच्या कारकिर्दीसाठी चांगली गोष्ट असून, तो या जागेवर यशस्वी देखील होऊ शकतो.”
गिलने आतापर्यंत भारतीय संघासाठी केवळ 13 कसोटी सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे त्याने या सर्व सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून भूमिकां निभावलेली. जयस्वाल हा सलामीच्या स्थानी आल्याने आणि दुसरीकडे तिसऱ्या क्रमांकाचा नियमित फलंदाज चेतेश्वर पुजारा संघातून बाहेर गेल्याने गिलने या जागेवर दावा केला. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला दोन युवा खेळाडू पहिल्या तीन स्थानांमध्ये खेळताना दिसतील.
(Aakash Chopra Talk About Shubman Gill Number 3 In Test Cricket)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात असे काही पहिल्यांदाच! शुबमन गिलच्या ‘या’ निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू हैराण
मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद