चालू वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात सुरु होणारा भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) सातत्याने चर्चेत आहे. आधी ओमिक्रोन विषाणू त्यानंतर कर्णधारपदाचा वाद या गोष्टी घडत आहेत. त्याच वेळी आता भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Test Vice Captain Rohit Sharma) दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी पूर्वाश्रमीचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला पुन्हा उपकर्णधार बनविण्यात यावे अशी मागणी माजी भारतीय सलामीवीराने केली आहे.
दुखापतग्रस्त झाला रोहित
निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघ जाहीर करताना मोठी घोषणा केली होती. सततच्या खराब कामगिरीमुळे अजिंक्य रहाणे याच्याकडून संघाचे उपकर्णधार पद काढून घेत रोहित शर्माकडे सोपवले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी रोहित शर्मा दुखापतग्रस्त (Rohit Sharma Injured) झाला. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी महिनाभराचा अवधी लागू शकतो. या कारणाने तो तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. त्यामुळे, संघाचे उपकर्णधार पद रिक्त झाले आहे. निवड समितीने व बीसीसीआयने अद्याप नव्या उपकर्णधाराचे नाव जाहीर केले नाही.
तर रहाणेला करावे उपकर्णधार
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा संघाचे उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे द्यावे अशी मागणी माजी सलामीवीर व समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी केली आहे. त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले,
“मला विचाराल तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेला पहायला आवडेल. कारण, नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने संघाचे कर्णधारपद भूषविले होते. सध्या तो खरा फॉर्ममध्ये असला तरी, त्याची संघात जागा बनल्यास तोच उपकर्णधार असावा.”
रहाणे याने संपूर्ण वर्षात २० पेक्षाही कमी सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या जागी हनुमा विहारी किंवा श्रेयस अय्यर यांना संधी देण्याची मागणी पुढे येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रियांक पांचालच्या निवडीमूळे संतापला माजी खेळाडू; म्हणाला, “हा त्या खेळाडूवर अन्याय…”
https://mahasports.in/ipl-is-reason-behind-controversy-in-indian-cricket/
रोहित-कोहलीमधील तथाकथित वादावर पडणार पडदा? स्वतः विराट घेणार पत्रकार परिषद