कोणत्याही क्रिडा प्रकारात सामान्याने पाहायला मिळणारी गोष्ट, जेव्हापर्यंत एखादा संघ विजय मिळवत असतो तेव्हापर्यंत त्या संघातील खेळाडूंचे आणि त्यांच्या सहयोगी कर्मचऱ्यांची वाह-वाह होत असते. पण, संघाचे प्रदर्शन बिघयाडला सुरुवात झाली की या सर्वांबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. असंच काही घडलं आहे, पाकिस्तान कसोटी क्रिकेट संघ आणि त्यांच्या ३ दिग्गज प्रशिक्षकांसोबत. Aamer Sohail Got Angry OH Pakistan Test Team Coaches
५ ऑगस्टपासून ते २५ ऑगस्टपर्यंत इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेच्या पहिल्या सामन्यातच पाकिस्तानला पराभव स्विकारावा लागला. दूसरा आणि तिसरा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत राहिला. त्यामुळे इंग्लंडने ही मालिका १-०च्या फरकाने जिंकली. यावरुन समजून येते की, पूर्ण कसोटी मालिकेत पाकिस्तानी कसोटी संघाचे प्रदर्शन वाईट राहिले आहे. कदाचित याच कारणामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार आमिर सोहेलने पाकिस्तान कसोटी संघावर आणि त्याच्या दिग्गज प्रशिक्षकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
आमिरने पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक, फलंदाजी प्रशिक्षख यूनिस खान आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार यूनुस यांच्या प्रशिक्षणाबाबत टीका केली आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आमिर म्हणाला की, “असं वाटतं आहे की पाकिस्तानचे दिग्गज प्रशिक्षक इंग्लंडला जिंकण्यासाठी नाही तर सुट्ट्यांची मजा लुटायला गेले होते.”
“पाकिस्तान संघाच्या फलंदाज आणि गोलंदाज सर्वांचे प्रदर्शन वाईट होते. दोन्ही विभागातील खेळाडूंनी अनेक चुका केल्या, मग या चुकांना सुधारणे हे कोणाचे काम होते? आम्ही प्रशिक्षकांना ठेवलंच कशासाठी होतं? ते काय तिथे सुट्ट्यांवर गेले होते. आणि जर ते सुट्टीवर गेले असतीलच तर त्यांना जगभराच्या प्रवासावर पाठलायला पाहिजे आणि खेळाडूंना तसेच खेळू द्यायला पाहिजे, जसे ते या कसोटी मालिकेत खेळत होते,” असे पुढे बोलताना आमिर म्हणाला.
तसेच पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शाहविषयी बोलताना आमिर म्हणाला की, “नसीम शाहच्या ऍक्शनमध्ये खुप उणिवा आहेत. त्यामुळे त्याला जास्त विकेट मिळाल्या नाहीत. जेव्हा तो चेंडू टाकतो तेव्हा त्याचा डावा हात वेगळ्याच पद्धतीने खाली पडतो. या सर्व गोष्टी प्रशिक्षकाने पाहायला पाहिजे होत्या. शाहीन अफ्रिदीलाही सुधारणा करण्याची खुप गरज आहे. त्याचे प्रदर्शन वेळेनुसार खूप बिघडत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रावोने रचला इतिहास! बनला असा कारनामा करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू
कर्नाटकच्या अनुराधाने रचलाय इतिहास, श्रीलंकाच्या लसिथ मलिंगाचा विश्वविक्रम केलाय नावावर
खुद्द क्रिकेटलाही ‘तो’ क्रिकेट खेळतोय याचा अभिमान वाटणारा जीमी…
ट्रेंडिंग लेख –
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान या ४ ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर असेल आयपीएल फ्रेंचायझीचीं नजर
मुंबई इंडियन्स आणि पाचवे आयपीएल विजेतेपद यांच्यात अडथळा ठरु शकतात ही ३ कारणे
कसोटी क्रिकेटची खरी चव २१व्या शतकात चाहत्यांना चाखायला देणारा अवलिया गोलंदाज






