बांगलादेशमध्ये सध्या बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh premier league) स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच या स्पर्धेत काही ना काही असा प्रकार घडत आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नुकताच आंद्रे फ्लेचरचा (Aandre Fletcher) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडिज संघाचा हा विस्फोटक फलंदाज बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेत खुलना टाइगर्स संघाकडून खेळतो. तर झाले असे की, खुलना टाइगर्स संघाची फलंदाजी सुरू असताना चट्टोग्राम चॅलेंजर्स संघाकडून ७ वे षटक टाकण्यासाठी रहमान राजा गोलंदाजीला आला होता. त्याने टाकलेल्या बाऊन्सर चेंडूवर आंद्रे प्लेचरने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्न फसला आणि चेंडू जाऊन त्याच्या हेल्मेटला लागला. चेंडू लागताच क्षणी तो मैदानावर पडला. हा चेंडू त्याला इतक्या जोरात लागला की, खाली पडल्यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.
आंद्रे फ्लेचरच्या दुखापतीबद्दल बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) डॉक्टरांनी सांगितले की, फ्लेचरला काही काळ मैदानावर निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते आणि तो ठीक दिसून येत होता. परंतु, खबरदारी म्हणून त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. माध्यमांना माहिती देताना खुलना टायगर्सचे व्यवस्थापक नफीस इक्बाल म्हणाले की, “आंद्रे फ्लेचर सध्या ठीक आहे आणि घाबरण्यासारखं काहीच नाहीये.”
Andre Fletcher rushed to Hospital after got hit in neck in Bangabandhu Bangladesh Premier League.pic.twitter.com/JaeyqZI0eC
— Viyatu Sports (@ViyatuSports) January 25, 2022
या सामन्यात खुलना टायगर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चट्टोग्राम चॅलेंजर्स संघाकडून बेनी हॉवेलने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. तर सब्बीर रहमानने ३२ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर या संघाला २० षटक अखेर ७ बाद १९० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना खुलना टायगर्स संघाला अवघ्या १६५ धावा करण्यात यश आले. हा सामना खुलना टायगर्स संघाने २५ धावांनी गमावला.
महत्वाच्या बातम्या:
‘या’ पंचांच्या डोक्यावर सजला ‘आयसीसी अंपायर ऑफ द इयर’चा ताज; भारत-द. आफ्रिका वनडे ठरलेला शतकी सामना
हे नक्की पाहा: