ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचची बॅट बऱ्याच दिवसांपासून शांत आहे. या दबावामुळे त्याला एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. ऍरॉन फिंच शेवटच्या वेळी म्हणजे ११ सप्टेंबर २०२२ रोजी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय खेळण्यासाठी बाहेर आला, पण फिंचने त्याच्या चाहत्यांची निराशा केली. त्याच्या शेवटच्या सामन्यातही ऍरॉन फिंचची बॅट चालली नाही आणि त्याला केवळ 5 धावा करता आल्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात, ऍरॉन फिंच नेहमीप्रमाणे सलामीला आला आणि तो 13 चेंडूत 5 धावा काढून टीम साऊथीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. फिंच यावर्षी 14 वा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता, परंतु 13व्यांदा त्याला अर्धशतकही गाठता आले नाही. या वर्षात तो खातेही न उघडता पाच वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: नेहमी भारताला नडणाऱ्या आफ्रिदीच्या मुलीने फरडकावला भारताचा तिरंगा! स्वत: केलाय मोठा खुलासा
पहिल्याच सामन्यात चाहत्यांनी अनुभवले इरफानचे जुने रुप, सोशल मीडियावर होतंय कौतुक