ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार ऍरॉन फिंच याने भारताची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे, जी जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळू शकते. डब्ल्यूटीसी 2021-23चा अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात आमने सामने असतील. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या 11 खेळाडूंना भारतीय संघ व्यवस्थापन विश्वास दाखवणार हे देखील पाहण्यासारखे असेल.
ऍरॉन फिंच (Aaron Finch) याने डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताचे तीन वेगवान, तर दोन फिरकी गोलंदाज आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत फिंचने केएस भरतच्या आधी ईशान किशला प्राधान्य दिली आहे. ऍरॉन फिंचने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून रोहित शर्मा याच्या साथीला शुबमन गिल याची निवड केली आहे. तसेच वरच्या फळीत चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी निवडला गेला आहे. मध्यक्रमात विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना ईशान किशन आणि रविंद्र जडेजाची साथ मिळेल. रहाणे (Ajinkya Rahane) तब्बल 18 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. श्रेयस अय्यर याला दुखापत झाल्यामुळे त्याला संघात पुनरागमनाची संधी मिळाली आहे.
फिंचने तीन वेगवान गोलंदाजांच्या रूपात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांची निवड केली आहे. शार्दुल ठाकुर गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही हातभार लावू शकतो. फिरकीपटूंमध्ये रविंद्र जडेजाला अनुभवी रविचंद्रन अश्विनची साथ मिळेल. (Aaron Finch has selected India’s playing XI for the WTC final)
ऍरॉन फिंचने निवडलेली भारतीय प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ एका फोनमुळे हुकलं होतं सेहवागचं पदार्पण, नाहीतर शारजाहमध्ये आलं असतं वादळ
खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची एकाधिकारशाही आयपीएलमुळे संपली! डब्ल्यूटीसी फायनलआधी पॅट कमिन्सचे मोठे भाष्य