सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
फिंचने १२४ चेंडूत ११४ धावांची शतकी खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. फिंचचे हे वनडे कारकिर्दीतील १७ वे शतक होते. याबरोबरच वनडेमध्ये ५००० धावांचा टप्पाही पार केला आहे. यासह अनेक विक्रम त्याने केले आहेत, त्याचा घेतलेला हा आढावा –
१. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक वनडे शतके करणारे फलंदाज –
२९ शतके – रिकी पाँटिंग
१८ शतके – डेविड वॉर्नर
१८ शतके – मार्क वॉ
१७ शतके – ऍरॉन फिंच
१६ शतके – ऍडम गिलख्रिस्ट
२. वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारे ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर –
१८ शतके – डेविड वॉर्नर
१७ शतके – ऍरॉन फिंच
१६ शतके – ऍडम गिलख्रिस्ट
१५ शतके – मार्क वॉ
१० शतके – मॅथ्यू हेडन
३. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू –
२१ शतके – रिकी पाँटिंग
६ शतके – ऍरॉन फिंच
५ शतके – मायकल क्लार्क
५ शतके – स्टिव्ह स्मिथ
४. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद ५००० धावा करणारे फलंदाज –
११५ डाव – डेविड वॉर्नर
१२६ डाव – ऍरॉन फिंच
१२८ डाव – डिन जोन्स
महत्त्वाच्या बातम्या –
मोठमोठे विक्रम आपल्या नावावर करणारा विराट सिडनी स्टेडीयमवर ‘फ्लॉप’; पाहा आकडेवारी
बापरे! केवळ १५ तासांत होणार ३ आंतरराष्ट्रीय सामने, भारत ऑस्ट्रेलिया वनडे सामन्याने सुरुवात
भारत-ऑस्ट्रेलियातील चालू सामन्यात उमटले ‘त्या’ राजकीय वादाचे पडसाद, थेट मैदानावर आला आंदोलक आणि…






