भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पाहिला सामना शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अनुभवी फलंदाज रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हा वनडे सामना खेळणार आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत हा संघ कशी कामगिरी करेल? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा विक्रम शानदार आहे. त्याने 50.17 च्या सरासरीने 1154 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 5 शतकेही ठोकली आहेत. परंतु, सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो नेहमीच अपयशी ठरला आहे.
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये 6 वनडे सामने खेळले आहे. यामध्ये त्याने 9 च्या सरासरीने अवघ्या 36 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या मैदानावर 21 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
विराटने मागील वनडे सामना 11 फेब्रुवारी 2020 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यात त्याने अवघ्या 9 धावा केल्या होत्या.एवढेच नव्हे, तर मागील एक वर्षांपासून त्याने एकही वनडे शतक ठोकलेले नाही. ऑगस्ट 2019 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक ठोकले होते.
सिडनी मैदानावरील विराटची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात तो कसे प्रदर्शन करेल हे पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे! केवळ १५ तासांत होणार ३ आंतरराष्ट्रीय सामने, भारत ऑस्ट्रेलिया वनडे सामन्याने सुरुवात
भारत-ऑस्ट्रेलियातील चालू सामन्यात उमटले ‘त्या’ राजकीय वादाचे पडसाद, थेट मैदानावर आला आंदोलक आणि…
पंचहजारी फिंच! भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात केला खास विक्रम






