---Advertisement---

वॉर्नरवरील कर्णधारपदाची बंदी लवकरच उठणार! स्वतः एरॉन फिंचने दिलेत संकेत

On: सोमवार, सप्टेंबर 12, 2022 5:00 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन दिग्गज एरॉन फिंच याने रविवारी (11 सप्टेंबर) रोजी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या एकदिवसीय निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाला नवीन कर्णधाराची आवश्यकता आहे. स्टीव स्मिथ आणि पॅट कमिन्स यांची नावे एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदासाठी पुढे येत आहेत. परंतु फिंचने मात्र कर्णधारपदासाठी वॉर्नरच्या नावाचे समर्थन केल्याचे दिसत आहे. दरम्यान, वॉर्नर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातल्यामुळे त्यांच्या देशासाठी कर्णधाराची भूमिका पार पाडू शकत नाहीये. 

डेविड वॉर्नर (David Warner) आणि एरॉन फिंच (Aaron Finch) यांनी ऑस्ट्रेलियासाठी अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करून विजय मिळवला आहे. सचिन तेंडूल-सौरव गांगुल, सचिन तेंडूलकर-विरेंद्र सेहवाग, मॅथ्यू हेडन-एडम गिलक्रिस्ट, रोहित शर्मा-शिखर धवन अशा अनेक सलामीवीरांच्या जोड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावजलेल्या आहेत. वॉर्नर आणि फिंच यांना देखील या सलामीवारांच्या जोड्यांमध्ये गणले जाते. असे असले तरी, वॉर्नर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्बंधांमुळे सध्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार बनू शकत नाही. मात्र, फिंचच्या मते बोर्डाचे त्याच्यावर लक्ष आहे आणि त्याला कर्णधारपद दिले जाऊ शकते.

एगा प्रादेशिक रेडिओवर बोलताना फिंच म्हणाला की, “मला वाटत आहे की, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) वॉर्नरलवर नजर ठेवून आहे. त्याला पुन्हा कर्णधार बनवण्याचा विचार सुरू आहे. तो असा खेळाडू आहे, ज्याला मी ऑस्ट्रेलियन संघासाठी अनेकदा खेळताना पाहिले आहे. जेव्हा कधी त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. तो एक अविश्वसनीय कर्णधार बनू शकतो.”

दरम्यान, वॉर्नर, स्टीव स्मिथ आणि कॅमरन बॅनक्रॉप्ट या तिघांवर 2018 साली क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठी कारवाई केली होती. या तिघांना चेंडूशी छेडछाड केल्यामुळे एक वर्षाची बंदी घातली केली होती. त्यानंतर या तिघांनी संघात पुनरागमन केले खरे पण वॉर्नरवरील कर्णधारपदाची बंदी मात्र अद्याप संपलेली नाहीये. मागच्या मोठ्या काळापासून वॉर्नरला राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी, अशी मागणी अनेकदा केली गेली आहे.  अशात क्रिकेट ऑस्ट्रेलिया याविषयी काय निर्णय घेते हे आता येणाऱ्या काळात लवकरच कळेल.

फिंचच्या एकदिवसीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने एकूण 146 सामने खेळले आणि 5406 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 38.89 होती तर स्ट्राईक रेट 87.73 धावांची होती. त्याने या धावा 17 शतक आणि 30 अर्धशतकांच्या मदतीने केल्या. त्याने एकूण 54 एकदिवसीय सामन्यांमध्ये सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका पार पाडली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

PAKvsSL: ‘या’ खेळाडूंच्या भन्नाट कामगिरीने श्रीलंका झाला सहाव्यांदा आशिया चषकाचा चॅम्पियन
पाकिस्तानी खेळाडू स्वतःच्या चुकीमुळे नाराज; म्हणाला, ‘माफ करा, पराभवाची जबाबदारी…’
Asia Cup | ‘या’ पाच प्रसंगांमुळे अंतिम सामना अधिकच रंगला, मधुशंकाने तर हद्दच केली  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---