---Advertisement---

जमतंय! आवेशच्या जाळ्यात २ वेळा अडकला धोनी, कर्णधार पंतच्या ‘या’ रणनितीचा यामागे राहिलाय वाटा

On: बुधवार, ऑक्टोबर 13, 2021 7:02 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ ला येत्या २ दिवसांत विजेता संघ मिळणार आहे. शुक्रवार रोजी (१५ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ चा अंतिम सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने साखळी फेरी सामन्यांसह प्लेऑफमध्ये दमदार प्रदर्शन करत सर्वात आधी अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यापैकी एक संघ या सामन्यात प्रवेश करेल. तत्पूर्वी दिल्ली संघासाठी यंदाच्या हंगामात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या गोलंदाज आवेश खान याने हंगामातील त्याचे खास क्षण सांगितले आहेत.

आवेशने या हंगामात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्याच्या भेदक माऱ्यापुढे एमएस धोनीसारखा फलंदाजही तग धरू शकला नाही. आवेशने यंदा धोनीला २ वेळा पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. त्याची विकेट घेणे, हे आवेशच्या यंदाच्या हंगामातील सर्वात खास क्षणांपैकी एक असल्याचे त्याने सांगितले आहे. याबरोबरच त्याचा संघनायक रिषभ पंतने यासाठी त्याला कशी मदत केली, याबद्दलही त्याने उलगडा केला आहे.

ईएसपीएनशी बोलताना आवेशला विचारले गेले की, पहिल्या टप्प्यात धोनीची विकेट घेण्यासाठी त्याने काय योजना आखली होती. याचे उत्तर देताना आवेश म्हणाला की, “जेव्हा माही भाई फलंदाजीसाठी आला तेव्हा पंतने मला त्यांना मिड ऑन आणि मिड ऑफवर शॉट मारण्यास भाग पाडायला सांगितले. धोनीने त्यावेळी मिड ऑन आणि मिड ऑफच्या वरुन मारण्याचा प्रयत्न केला, तरीही चालेल. परंतु त्याला फुल चेंडू टाकू नकोस, फक्त लेंथवर गोलंदाजी करत राहा असे त्याने मला सांगितले होते.”

“सुरुवातीला मला त्याची योजना समजली नाही. मी त्याला म्हटले की, ३० यार्डच्या वर्तुळात आपण ५ खेळाडूंऐवजी चौघांना क्षेत्ररक्षणसाठी थांबवू. परंतु त्याने त्यास नकार दिला. पुढे माही भाईने दोन्ही क्षेत्ररक्षकांना पाहून वरुन शॉट मारण्यास सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच काळापासून क्रिकेट न खेळल्याने ते आमच्या जाळ्यातही फसले. एकंदरित पंतने परिस्थितीचा फायदा घेतला आणि मला विकेट मिळाली.”

पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही आवेशने धोनीला बाद केले होते. यामागची रणनिती सांगताना आवेश म्हणाला की, “युएई टप्प्यात झालेल्या सामन्यात धोनी फलंदाजीला आल्यानंतर मी पुन्हा त्याच्याशी चर्चा केली होती. यावेळी त्याने मला हार्ड लेंथने चेंडू फेकण्यास सांगितले होते. माही भाईला तेच चेंडू टाक. कारण इथे फलंदाजी करणे तितके सोपे नाही, असे तो मला म्हणाला. मीही त्याने सांगितल्यानुसार गोलंदाजी केली आणि चेंडू माही भाईंच्या बॅटची कडा घेत ते बाद झाले.”

महत्त्वाच्या बातम्या-

क्यूटनेस ओव्हरलोडेड! धोनी आणि रैनाच्या मुलींचा गोड रॅम्प वॉक, सीएसकेच्या शिलेदारांच्या मुलांची मस्तीच मस्ती

“त्याच्यात धोनीसारखा कर्णधार होण्याचे गुण”, माजी इंग्लिश कर्णधाराने आरसीबीच्या नेतृत्वासाठी सुचवला पर्याय

केकेआरला सात वर्षांनंतर जिंकायचीय ट्रॉफी; मात्र, सेनापतीच्या बॅटला लागलाय गंज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---