भारताने यंदाच्या वर्षी आपला ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी भारतीय खेळाडूंशिवाय जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनी भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिविलियर्स देखील यासामील आहे. मात्र, एबी डिविलियर्सने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शुभेच्चा देत आसताना एक चुक केली आहे.
Happy 76th #Independence day India!
I feel loved every time I play in India, no matter which team I play for
Congratulations on #75NotOut from all of us!@BCCI @IPL @Dream11 @josbuttler @jbairstow21 #kanewilliamson @faf1307 @KagisoRabada25 pic.twitter.com/k264vh5r7k— AB de Villiers (@ABdeVilliers17) August 15, 2022
डिव्हिलियर्सने आपल्या ट्विटमध्ये बीसीसीआयला टॅग केले आणि लिहिले की, “७६व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जेव्हा मी भारतात खेळतो तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडतो, मग मी कोणत्या संघासाठी खेळतो हे महत्त्वाचे नाही. आपल्या सर्वांकडून #75NotOut साठी अभिनंदन!” डिविलियर्सने केलेल्या या चुकीमुळे सध्या तो सोशल मिडीयावर ट्रोल होत आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
स्वातंत्र्यदिनी कॅप्टन रोहितकडून नकळत झाली ‘ही’ भलीमोठी चूक, चाहत्यांनी केले चांगलेच ट्रोल
Breaking : विश्वचषकात सर्वात जलद शतक करणारा ‘हा’ दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर