पाकिस्तान क्रिकेटमधील माजी दिग्गज आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या गोलंदाजीची चर्चा आजही होत असते. अख्तरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. त्याने ताशी १६१.३ किमीच्या वेगाने हा चेंडू टाकला होता. अख्तर त्याच्या गतीसोबत खेळपट्टीवरील फलंदाजाला घाबरवण्यासाठी देखील ओळखला जायचा. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसनने अख्तरच्या अशाच एका वेगवान चेंडूचा सामना केला होता, जो आजही अनेकांच्या स्मरणात आहे. यावर आता एबी डिविलियर्सची प्रतिक्रिया आली आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो शेन वॉटसनने रिट्विट केला आहे. व्हिडिओत शेन वॉटसन (Shane Watson) स्ट्राईकवर फलंदाजी करत आहे आणि शोएब अख्तर (Shoaib Akhtar) गोलंदाजी करत आहे. अख्तरने एक वेगवान बाऊंसर टाकला, जो फलंदाज आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून थेट चौकारासाठी जातो. अख्तरच्या या चेंडूवर ऑस्ट्रेलियन संघाला जरी चार धावा मिळाल्या असल्या, तर हा चेंडू खूपच खतरनाक होता. फलंदाजी करणाऱ्या वाटसनच्या चेहऱ्यावर या चेंडूनंतर अख्तरविषयीची भीती स्पष्ट दिसत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हा प्रसंग घडला, त्यादिवशी वॉटसनचा वाढदिवस असल्याचे समजते. वॉटसनने हा व्हिडिओ रिट्विट करून लिहिले की, “माझा २१वा वाढदिवस साजरा करण्याची काय भारी पद्धत होती. शोएब अख्तर खरंच खूप भारी आणि खूप खतरनाक चेंडू होता.” वॉटसनच्या या ट्वीटवर दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स (AB De Villers) देखील व्यक्त झाला आहे. डिविलियर्सने रिप्लाय करत लिहिले की, “होय, मला अजूनही भीतीदायक स्वप्न येतात.” चाहत्यांकडून या ट्वीटवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.
Oh man! I still get nightmares 😂
— AB de Villiers (@ABdeVilliers17) April 28, 2022
डिविलियर्सचा रिप्लाय आल्यानंतर अख्तरनेही त्याला उत्तर दिले आहे. डिविलियर्सला जरी अख्तरची भीतीदायक स्वप्न पडत असली, तरी त्याने स्वत: अनेक गोलंदाजांची झोप नक्कीच उडवली आहे. डिविलियर्स त्याच्या धमाकेदार फलंदाजीसह मैदानाच्या चारही बाजूला चौकार आणि षटकारांचा पाऊन पाडायचा. त्याची हीच खासियत लक्षात घेऊन अख्तरने लिहिले की, “एबी तू स्वतः अनेक गोलंदाजांची झोप उडवली आहेस. तुझ्यासोबत चर्चा करून नेहमी चांगले वाटते.”
अख्तरच्या या ट्वीटवर डिविलियर्सने पुन्हा रिप्लाय दिला आणि एका प्रसंगाची आठवण काढली. दक्षिण आफ्रिकेच्या सुपरस्पोर्ट्स पार्कवर खेळताना अख्तरच्या एका चेंडूमुळे डिविलियर्स चांगलाच जखमी झाला होता. डिविलियर्सने रिप्लायमध्ये लिहिले की, “काय दिवस होते, जेव्हा मी त्याझ्या चेंडूवर पुल मारण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा तू माझा पाय जवळपास मोडलाच होता. चेंडू माझ्या बॅटवर लागताच माझ्या लक्षात आले होते की, मोठी चूक झाली आहे.”
Haha. Good old days! U almost broke my leg at Supersport Park in my early twenties after I decided to pull u for 6. The minute it hit my bat I knew it was a big mistake😄
— AB de Villiers (@ABdeVilliers17) April 28, 2022
दरम्यान, एबी डिविलियर्सने काही महिन्यांपूर्वी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली असून, तो आयपीएल २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग नाहीये, तर दुसरीकडे शेन वॉटसन दिल्ली कॅपिटल्सच्या सहायक प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भीमपराक्रम! अवघ्या २१व्या वर्षी पठ्ठ्याने चोपल्या ५७८ धावा