आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये गुरुवार (29 मे) रोजी क्वालिफायर एक सामना खेळला गेला. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने पंजाब किंग्स विरुद्ध 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला (RCB vs PBKS) . या विजयासोबत 9 वर्षानंतर आयपीएलच्या फायनलमध्ये आरसीबी पोहोचली आहे. साऊथ आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने त्याच्या माजी आयपीएल संघाला पाठिंबा दिला (south africa former cricketer ab devillears). आरसीबीला यावर्षीची पहिली चॅम्पियन ट्रॉफी मिळावी, यासाठी तो संघाला पाठिंबा देत आहे. यावर्षी आयपीएलमध्ये आरसीबी शानदार फॉर्ममध्ये आहे. आरसीबीने या हंगामात फक्त 4 सामने गमावले आहेत. त्यांनी लीग स्टेजमध्ये 19 पॉईंट्स मिळवले आणि संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला.
डिव्हिलियर्सने मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले, मी आनंदी आहे कारण आरसीबी फायनलमध्ये पोहोचली आहे. रात्री आम्ही मुंबईला जिंकताना पाहिले त्यामुळे मुंबई आणि पंजाबमध्ये सुद्धा एक चांगला क्वालिफायर सामना पाहायला मिळेल. त्या सामन्याची मी खूप प्रतीक्षा करत आहे. जो कोणी हा सामना जिंकेल तो, अंतिम सामन्यात आरसीबी विरुद्ध खेळेल. त्यामुळे अंतिम सामन्याची देखील मी खूप प्रतीक्षा करत आहे. मला आशा आहे की हे वर्ष आरसीबीसाठी शानदार राहील.
दिग्गज फलंदाज डिव्हिलियर्सने पंजाब किंग्स विरुद्ध आरसीबी अंतिम सामन्यात असेल. असं देखील त्याने सांगितलं. पण शुक्रवारी गुजरात विरुद्ध मुंबईचा दबदबा पाहून संशय आहे. तो म्हणाला, मी खूप आधी म्हणजे एक महिन्याआधी म्हटले होते की, पंजाब आणि आरसीबी फायनल खेळतील.
मुंबईसध्या खूप मजबूत दिसत आहे ,त्यामुळे असं वाटत आहे की माझ्या म्हणण्यानुसार काही होणार नाही. पण हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल तुम्ही सांगू शकत नाही. आपल्या विरोधी संघावर दबाव आणण्यासाठी चांगल्या प्रदर्शनाची गरज असते. त्यामुळे मला वाटते की पंजाब संघ अंतिम सामन्यात पोहोचेल. पण कालचा सामना बघितल्यानंतर माझ्या मनात थोडी शंका आहे.
पंजाब किंग्सला आता रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्वालिफायर दोन सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना खेळायचा आहे (PBKS vs Mi) . हा सामना जिंकणारा संघ 3 जून रोजी आरसीबी विरुद्ध खेळेल.





