बंगळूरु। आयपीएल 2019 मध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात 42 वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 17 धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील आव्हानही कायम ठेवले आहे.
बेंगलोरच्या या विजयात एबी डिविलियर्सने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 44 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 7 षटकार मारले. विशेष म्हणजे यातील तीन षटकार हे त्याने 19 व्या षटकात सलग तीन चेंडूवर मारले.
यातील एक षटकाराचा चेंडू तर थेट स्टेडियमच्या छतावर गेला. हा षटकार पाहुन डिविलियर्सलाही आश्चर्य वाटले. यावेळी प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून डिविलियर्स आणि मार्कस स्टॉयनिस फलंदाजी होते. तर 19 व्या षटकात मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता.
त्यावेळी शमीने या षटकातील टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर डेविलियर्सने लाँग ऑफला षटकार मारला. त्यानंतर पुढच्या चेंडूवरही डिविलियर्सने तसाच षटकार मारला. पण पाचवा चेंडू शमीने फुलटॉस टाकला.
कंबरेच्या उंचीएवढ्या टाकलेल्या या चेंडूवरुन डिविलियर्सने नजर हटवली. पण त्याने जोरात बॅट फिरवल्याने तो चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर गेला. यावेळी डिविलियर्सच्या एक हाताची बॅटवरील पकडही निसटली होती.
या षटकात डिविलियर्स आणि स्टॉयनिसने 21 धावा काढल्या. तर हार्डस विलजोनने गोलंदाजी केलेल्या शेवटच्या षटकात त्यांनी 27 धावा काढत बेंगलोरला 20 षटकात 4 बाद 202 धावांचा टप्पा गाठून दिला. स्टॉयनिसने डिविलियर्सची चांगली साथ देताना 34 चेंडूत 46 धावांची खेळी केली. तसेच या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 121 धावांची भागीदारी रचली.
त्यानंतर 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबला 20 षटकात 7 बाद 185 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना 17 धावांनी पराभव स्विकारावा लागला.
M42: RCB vs KXIP – AB de Villiers Six https://t.co/3jn6GwNkOb
— Aakash Biswas (@aami_aakash) April 24, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–सगळीकडे शोधलेला चेंडू, अखेर सापडला अंपायरच्याच खिशात, पहा व्हिडिओ
–केएल राहुलचा मोठा पराक्रम; रैना, कोहलीलाही जमले नाही ते करुन दाखवले
–सलग तीन विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला बसला सर्वात मोठा धक्का…