दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू मार्को जॅन्सन याला आयसीसीकडून मोठा सन्मान मिळाला. युवा खेळाडू मार्को जॅन्सन याने मागच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये राष्ट्रीय संघासाठी जबरदस्त अष्टपैलू प्रदर्शन केले, ज्यासाठी आयसीसीकडून त्याला इमर्जिंक प्लेअर ऑफ द ईयर म्हणून निवडले गेले. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका संघाचा माजी दिग्गज कर्णधार एबी डिविलियर्स याने जॅन्सनचे कौतुक केले. डिविलियर्सने जॅन्सनची तुलना थेट त्यांचा माजी दिग्गज अष्टपैलू शॉन पॉलक (Shaun Pollock) यांच्याशीच केली.
एबी डिविलियर्सकडून मार्को जॅन्सनचे कौतुक –
मार्को जॅन्सन (Marco Jansen) बद्दल बोलताना एबी डिविलियर्स (AB de Villiers) म्हणाला की, “त्याने खूपच उत्कृष्ट फलंदाजी केली, तो चांगला क्रिकेट खेळला. असे पुन्हा एकदा झाले की, एक खेळाडू ज्याविषयी मला काहीच माहिती नव्हते आणि अचानक त्याने एका आयपीएल हंगामात धमाकेदार प्रदर्शन केले आणि मला सांगितले की, तो दक्षिण आफ्रिकेचा आहे. मला ही गोष्ट आधी माहीत नव्हती. मला आहे की तो (मार्को जॅन्सन) एक गोलंदाजी अष्टपैलू आहे. जर त्याला यापेक्षा काही वेगळे वाटत असेल, तर हे त्याच्यासाठी चांगले आहे. त्याला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये योगदान देण्याचे चांगली संधी मिळाली.”
“मी जगातील काही सर्वश्रेष्ट अष्टपैलूंचा विचार करतो जसे बेन स्टोक्स आणि जुन्या दिवसांमधील जॅख कॅलिस यांसारख्या. यावरून समजते की, हे ठरवणे गरजेचे आहे की, तुम्ही फलंदाजी अष्टपैलू आहात की, गोलंदाजी अष्टपैलू. माझ्या मते तो एक गोलंदाजी अष्टपैलूच असेल. अशात आपली गोलंदाजी चांगली असेल, आणि आपण सर्वोत्कृष्ट बनू हे त्याला ठरवावे लागेल. पण नक्कीच स्वतःच्या फलंदाजीवर देखील काम केले पाहिजे,” असेही डिविलियर्स पुढे म्हणाला.
डिविलियर्सकडून जॅन्सनची शॉन पॉलकसोबत तुलना –
डिविलियर्सच्या मते शॉन पॉलक क्रिकेट इतिहासातील एक दिग्गज गोलंदाजी अष्टपैलू आहे आणि जॅन्सनने देखील पॉलकप्रमाणे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डिविलियर्स म्हणाला की, “आपण पाहिले आहे की, या बाबतीत शॉन पॉलक एक चांगले उदारहण झाला आहे. तो एक गोलंदाजी अष्टपैलू आहे, पण त्याने कसोटी क्रिकेटमध्ये काही शतके देखील केली आहेत. त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये फलंदाजीचे योगदान दिले आहे. अशात पॉलक मार्को जॅन्सनसाठी महत्वापूर्ण खेळाडू आहे. त्याने या गोष्टी लक्षात ठेवले पाहिजे की, त्याच्यातील सर्वोत्कृष्ट शैली कायम राहिले पाहिजेत आणि जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.” (AB de Villiers compared Marco Jansen to former great Shaun Pollock)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा दिग्गजही बनला सूर्याचा फॅन; तोंडभरून कौतुक करत आयसीसीलाच म्हणाला, ‘तो क्रांती घेऊन येतोय’
‘दोन कर्णधारांची काही गरज नाही’, वरिष्ठ खेळाडूचे रोखठोक वक्तव्य; म्हणाला, “रोहितने विश्वचषकात…”