क्रिकेटविश्वात अनेक उत्कृष्ट क्रिकेटपटू होऊन गेले आहेत आणि सध्याही अनेक प्रतीभावान खेळाडू आहेत. एवढ्या प्रतिभावान खेळाडूंमधून ११ खेळाडूंचा संघ निवडणे सोपे नाही. सध्या अनेक आजी- माजी खेळाडू आपापले सार्वकालीन ११ खेळाडूंचा संघ निवडताना दिसत आहेत. यात ‘मिस्टर ३६०’ एबी डिविलिर्सचाही समावेश झाला आहे. त्याने त्याचा आयपीएलमधील सार्वकालीन ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे. (AB de Villiers picks his all time IPL playing 11 not selected mr IPL in his team)
या संघात डिविलियर्सने सलामीवीर म्हणून भारताचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला स्थान दिले आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्याने आयपीएलमधील त्याचा कर्णधार विराट कोहलीला स्थान दिले आहे.
चौथ्या स्थानासाठी डिविलियर्सने ३ पर्याय ठेवले आहेत. यात पहिला पर्याय न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन आहे, तर दुसरा पर्याय म्हणून ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथला निवडले आहे. तसेच तिसरा पर्याय म्हणून त्याने स्वत:ला निवडले आहे.
पाचव्या क्रमांकावर त्याने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला ठेवले आहे. सहाव्या क्रमांकावर भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला ठेवले आहे. त्याने धोनीकडे संघाच्या नेतृत्वपदाची धुरा सोपवली आहे.
डिविलियर्सने भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाला सातव्या क्रमांकावर निवडले आहे. आठव्या क्रमांकावर त्याने अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला निवडले आहे. त्याच्या या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. त्यात प्रथम ९ व्या स्थानावर सनरायझर्स हैद्राबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला निवडले आहे.
दक्षिण आफ्रिका व आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा युवा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने १० व्या स्थानावर या संघात कब्जा केला आहे. ११ वे स्थान हे भारतीय संघातील ‘यॉर्कर किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहला दिले आहे.
असा आहे एबी डिविलिर्सने निवडलेला सार्वकालिन आयपीएल प्लेइंग ११ संघ-
वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, विराट कोहली, केन विलियमसन/स्टीव स्मिथ/एबी डिविलियर्स, बेन स्टोक्स, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, कागिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराह.
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात दर्शक देत होते न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना शिव्या, तपास लागताच काढलं स्टेडियमबाहेर
राखीव दिवसावर ओढावणार का ‘काळ्या ढगांचं संकट’?, पाहा साउथम्पटनच्या हवामानाचे अपडेट
तोच चेंडू, तिच विकेट अन् तेच सेलिब्रेशन; मोहम्मद शमीच्या ‘त्या’ विकेटने आठवला २०१६चा सामना