---Advertisement---

लाईव्ह सामन्यात दर्शक देत होते न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना शिव्या, तपास लागताच काढलं स्टेडियमबाहेर

fans-in-stadium
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. हा सामना साऊथम्पटनच्या द रोज बाउल स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा ऐतिहासीक सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला गेला आहे. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून गैरवर्तवणूक केल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे. तसेच या गोष्टीची आयसीसीनेही दखल घेतली आहे.

या सामन्याच्या पाचव्या दिवशी सामना पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांकडून खेळाडूंना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. आयसीसीने म्हटले कि, “आम्हाला न्यूझीलंड संघातील खेळाडूंसोबत गैरवर्तवणूक झाली असल्याची बातमी मिळाली आहे. आमच्या सुरक्षा पथकाला दोषी चाहत्यांना ओळखण्यात यश आले होते. त्यानंतर लगेचच त्यांना मैदानाबाहेर काढून टाकण्यात आले.”

आयसीसीचे स्पष्ट म्हणणे आहे कि, “आम्ही क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करणार नाही.”(WTC final: Two spectator ejected for abusing new zealand player)

वर्णद्वेषी टीका देखील करण्यात आली
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, “शिवीगाळ करणारे दोन प्रेक्षक ब्लॉक एममध्ये होते. हा ब्लॉक खेळाडूंच्या निवासस्थानाच्या अगदी जवळ आहे. असे म्हटले जात आहे की, गैरवर्तवणूक साधारण आणि वर्णद्वेषी दोन्ही प्रकारची होती. आयसीसीला सोशल मीडियावरुन काही प्रेक्षकांद्वारे या व्यक्तींबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा पथकाने त्यांचा शोध घेणे सुरु केले होते.”

 खेळाडूंना याबाबत कल्पना नाही
असे म्हटले जात आहे कि, रॉस टेलरवर जास्त निशाणा साधला गेला होता. तसेच टीम साऊथीने म्हटले कि, “कुठल्याही खेळाडूला याबाबत माहिती मिळाली नाहीये. आम्हाला खरंच याबाबत कल्पना नाही कि, मैदानाबाहेर काय होत आहे.”

महत्वाच्या बातम्या –

सेव्ह द डेट विथ क्रिकेट! आज रंगणार ९ क्रिकेट सामन्यांचा थरार, WTC फायनलचा लागेल निकाल

कर्णधार कोहलीच्या चाणाक्ष रणनितीपुढे न्यूझीलंडचे लोटांगण, समालोचकांनी तोंडभरुन केली स्तुती

‘बस्स, आता ब्रेकअप’! किवी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे गिल सपशेल फ्लॉप अन् सारा झाली ट्रोल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---