आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या हंगामात दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स मागील काही हंगामांप्रमाणेच यंदाही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाकडून खेळतांना दिसणार आहे. त्याची आक्रमक फलंदाजी पाहण्यासाठी चाहते देखील आतुर आहेत.
मात्र हा हंगाम सुरू होण्यापूर्वी एका वेगळया कारणाने डिव्हिलियर्स चर्चेत आला आहे. त्याने आयपीएलची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. त्याने निवडलेल्या या प्लेइंग इलेव्हनमधील काही खेळाडूंची नावे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
असा आहे डिव्हिलियर्सचा संघ –
डिव्हिलियर्सने या संघाचे कर्णधारपद अपेक्षेप्रमाणे एमएस धोनीला दिले आहे. धोनीची आयपीएल मधील आणि जागतिक क्रिकेटमधील कामगिरी पाहता हा निर्णय अगदीच साहजिक मानला जातो आहे. डिव्हिलियर्सने सलामीवीर म्हणून या संघात भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि भारताचाच विद्यमान सलामीवीर रोहित शर्मा यांना स्थान दिले आहे.
तिसर्या क्रमांकावर डिव्हिलियर्सने आपला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा सहकारी व जिगरी दोस्त विराट कोहलीची निवड केली आहे. मात्र कोहलीला कर्णधारापद देणे टाळले आहे. चौथ्या क्रमांकावर त्याने तीन फलंदाजांचे नाव ठेवले आहे. यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन, ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ आणि स्वतःला संधी दिली आहे. त्यानंतर त्याने कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून एमएस धोनीला संधी दिली आहे.
या संघात अष्टपैलू म्हणून बेन स्टोक्स आणि रवींद्र जडेजा या दोन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. बेन स्टोक्स वेगवान गोलंदाजी तर जडेजा फिरकी गोलंदाजी करत असल्याने संघात समतोल साधला गेला आहे. गोलंदाजांच्या फळीत त्याने अफगाणिस्तानचा लेगस्पिनर रशीद खानला स्थान दिले आहे. तर वेगवान गोलंदाजांच्या स्थानावर भुवनेश्वर कुमार, कागिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराह यांना संधी दिली आहे.
डिव्हिलियर्सची आयपीएल ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन –
वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, विराट कोहली, केन विलियम्सन/स्टीव स्मिथ/एबी डिव्हिलियर्स, बेन स्टोक्स, एमएस धोनी (यष्टीरक्षक-कर्णधार), रवींद्र जडेजा, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या –
महाकठीण! आयपीएलमधील धोनी-कोहलीने केलेले ‘हे’ विक्रम रोहितलाही मोडणे आहे केवळ अशक्य
मानलं तुम्हाला! आयपीएलमध्ये एकही शतक न करता ‘या’ तीन दिग्गजांनी ठोकल्यात चार हजार धावा
आयपीएलमध्ये षटकार म्हटलं की रोहित-विराट नाही, तर ‘हे’ तीघे फलंदाज आहेत सर्वात पुढे