दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स (ab de villiers) याने विराट कोहलीसोबत त्याच्या मैत्रीची सुरुवात कशी झाली, याविषयी खुलासा केला आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) आणि एबी डिविलियर्स आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी (RCB) अनेक वर्ष एकत्र खेळले आहेत. या दोघांच्या जोडीला चाहत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. आरसीबी पॉडकास्टमध्यो बोलताना डिविलियर्स विराटविषयी खूप काही बोलला आहे.
विराटसोबत मैत्रीची सुरुवात कशी झाली, याविषयी बोलताना डिविलियर्स म्हणाला, “व्यवस्थित भेटण्यापूर्वी एक दोन वेळा आमची एकमेकांशी भेट झाली. मी त्याला ओळखायचो आणि तोही मला ओळखत होता. मी आधीही अनेकदा सांगितले आहे की, तो एक युवा खेळाडू होता, जो थोडा अहंकारी वाटायचा. त्यामुळे हा त्याच्याविषयी माझा पहिला समज होता. मी पाहू शकत होते की, त्याला सन्मान मिळाला आहे आणि पुढे मला वाटले की, त्याच्यामध्ये काहीतही खासीयत आहे. आमच्यात एक छोटीशी चर्चा झाली. मी त्याचे कौतुक किंवा तसे काहीच बोललो नव्हतो. परंतु, मला चांगले लक्षात आहे की, जेव्हा मला आरसीबीने विकत घेतले. तेव्हा आम्ही एकत्र खेळण्याविषयी उत्सुक असल्याची चर्चा केली होती.”
“एकदा जेव्हा मी बेंगलोरमध्ये पोहोचलो, तेव्हा आमच्यात लगेचच चर्चा सुरू झाली. आमच्यात चांगल्या मैत्री तेव्हा सुरू झाली, जेव्हा मी २०११ मध्ये आरसीबीसाठी खेळायला सुरुवात केली. शक्यतो तेव्हापासूनच आम्ही चांगले मित्र बनू लागलो. मी असा व्यक्ती आहे, जो कोणासोबत जास्त संपर्कात राहत नाही, पण काही कारणास्तव विराटसोबत तसे झाले. त्यामुळेच आम्ही संपर्कात राहतो. आम्हा दोघांमध्ये अनेक गोष्टी समान आहेत. ज्याप्रकारे आम्ही खेळतो, त्यात खूप साम्य आहे.” असे डिविलियर्स पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, मागच्या वर्षी डिविलियर्सने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चाहत्यांना तो खेळताना दिसणार नाही. तर दुसरीकडे विराट कोहलीही एका खेळाडूच्या रूपात दिसेल. मागच्या आयपीएल हंगामात विराटने जाहीर केले होते की, तो पुढच्या हंगामापासून आरसीबीचे नेतृत्व करणार नाहीये. अशात पुढच्या हंगामासाठी संघाला एक नवीन कर्णधार शोधावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
भावा…एकदम कडक! ‘कौशल’च्या कौशल्याने सगळेच थक्क; U19 अंतिम सामन्यात घेतलाय भन्नाट कॅच
U19 WC FINAL| नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने; प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय