---Advertisement---

विराटशी कोणतीही गोष्ट बोलताना डिव्हिलियर्सला वाटते भीती, कारण जाणून व्हाल चकीत

On: मंगळवार, सप्टेंबर 14, 2021 12:29 PM
Virat Kohli and AB de Villiers
---Advertisement---

दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स त्याच्या दमदार फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. आयपीएल फ्रेंचायझी आरसीबीने त्याला संघात २०११ मध्ये सामील केले, त्यावेळी कर्णधार विराट कोहली आधीपासूनच संघासोबत होता. विराट आणि डिव्हिलियर्स यांच्यातील चांगली मैत्री जगजाहीर आहे. हे दोघे एकमेकांविषयी नेहमीच प्रशंसा आणि सन्मान व्यक्त करताना दिसले आहेत.

काही दिवसांपूर्वी डिव्हिलियर्स गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या कार्यक्रमात आला होता. कार्यक्रमात त्याने अनेक गोष्टींवर चर्चा केली असून कर्णधार विराट कोहलीविषयीही एक खास खुलासा केला आहे.

डिविलियर्सने कार्यक्रमात सांगितले आहे की विराट इतरांची किती काळजी करतो, ज्यामुळे डिव्हिलियर्स त्यांच्याशी बोलताना आणि एकादी गोष्ट सांगताने घाबरतो. तो म्हणाला की, ‘तसे तर विराट त्याच्यासाठी सर्वकाही व्यवस्थित करतो. विराट खूप मोठा स्टार आहे, पण मी त्याला आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घेताना पाहिले आहे. तो दुसऱ्या लोकांसाठी वेळ काढतो, जे त्याच्यासाठी खूप अवघड आहे. मला आता त्याला काहीही सांगायला भीती वाटते. कारण मी म्हटले , ‘मला तुझा बूट आवडला’, तर पुढच्याच मिनिटाला तो माझ्यासाठी त्या बूटांचे नियोजन करतो. मग मी त्याला म्हणतो ‘विराट, हे थांबव.’ तो सर्वांची काळजी करतो.’

डिव्हिलियर्सने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाविषयीही सांगितले. तो म्हणाला, ‘मी नेहमी संघाविषयी विचार करतो. असे कधीच झाले नाही की, मी केवळ स्वत:विषयी विचार केला. मात्र, मी एका अशा स्थितीत होतो, जेथे एक निर्णय घ्यायचा होता, जेथे असे वाटते की फक्त स्वत:विषयी विचार केला. याची अनेक कारणे आहेत. पुढे जायचे होते, खूप गोष्टी आहेत ज्यांनी एक भूमिका पार पाडली आहे. परिवार निश्चितच याचे एक कारण आहे. मी १५ वर्ष खेळलो आणि एवढे वर्ष खेळल्यानंतर मी थकलो होतो.’

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्याचे हिरो! सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज

केकेआरमध्ये संधी मिळत नसल्याने कुलदीपने व्यक्त केली खंत; म्हणाला, ‘विदेशी कर्णधार समजून घेऊ शकत नाही’

‘ज्यादाचा वनडे किंवा टी२० सामना खेळण्यास तयार, पण मुद्दा हा नाही, तर…’, गांगुलीचे मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---