भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. 13 मे सोमवार रोजी त्याने इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने 14 वर्षांच्या मोठ्या कसोटी क्रिकेट करियरला पूर्णविराम केला. रोहित नंतर विराटनेही निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
विराटच्या निवृत्तीनंतर संपूर्ण भारत देश भावुक झाला आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी तसेच चाहत्यांनी त्याला या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यातीलच विराटच्या जवळचा मित्र साऊथ आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सने विराटसाठी खास संदेश दिला आहे. त्याने विराटसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, “माझ्या बिस्कोटी विराटचं कसोटी क्रिकेटसाठी खूप अभिनंदन. तुझी जिद्द आणि कौशल्य नेहमीच मला प्रेरणा देत आली आहे, तू खरच एक महान खेळाडू आहे असं त्याने म्हटलं आहे. आपण नेहमीच बघत आलो आहोत क्रिकेटमध्ये विराट आणि डिव्हिलियर्स नातं खूप खास मानलं जातं.
तसेच अनेक दिग्गजांनीही विराटच कसोटी कारकिर्दीबद्दल कौतुक आणि अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काही चाहत्यांनी चिकू एवढ्या लवकर का? , अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही. अशा शब्दात भावुक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
विराटने त्याच्या 14 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये 123 सामन्यात 9230 धावा करत 31 अर्धशतक 30 शतके झळकावली आहेत.





