सध्या भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली खराब फॉर्मसोबत झुंजत आहे. अशा परिस्थितीत अनेकजण त्याच्यावर टीका करण्यात व्यस्त आहेत. मात्र, दक्षिम आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज आणि कोहलीचा चांगला मित्र म्हणून ओळखला जाणार एबी डिव्हिलियर्सने त्याच्याबाबत एक मोठे विधान केले आहे.
एबी डिव्हिलियर्सने कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल मोकळेपणाने बोलला. तो म्हणाला की, “विराट कोहली क्रिकेट खेळणाऱ्या महान खेळाडूंपैकी एक आहे. फॉर्म तात्पुरता असेल तर क्लास कायमस्वरूपी असेल. हीच गोष्ट विराटला लागू होते. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. मी आणि विराट नियमित संपर्कात आहोत. आम्ही मित्र आहोत आणि तुम्ही खराब फॉर्ममधून जात असताना कठोर परिश्रम करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची विराटला मला नक्कीच गरज नाही.” कोहलीने नोव्हेंबर २०१९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘वंडर बॉय’ गिलच्या ‘वंडरफुल शतकाने रोहितचा १२ वर्ष जुना विक्रम ध्वस्त
शुबमन गिलच्या शतकापुढे झिम्बाब्वे बेहाल, भारताने पहिल्या डावात रचला २८९ धावांचा डोंगर