येत्या काही दिवसात भारतात आयपीएल स्पर्धेचे आयोजन होणार आहे. ही स्पर्धा ९ एप्रिल पासून सुरु होणार आहे. तसेच या मालिकेतील अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळणाऱ्या दिग्गज फलंदाजाने येत्या सप्टेंबर महिन्यात नेपाळमध्ये होणाऱ्या एव्हरेस्ट प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची तयारी दर्शवली आहे.
जगभरातील देशांमध्ये अनेक मोठ मोठ्या लीग स्पर्धांचे आयोजन केले जाते. यात जगभरातील उत्कृष्ट खेळाडू सहभाग घेत असतात. भारतात आयपीएल स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये बीग बॅश लीग, पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग तर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा खेळली जाते.
या टी२० लीग स्पर्धांमध्ये आणखी एक स्पर्धेची भर पडणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात नेपाळमध्ये एव्हरेस्ट प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या लीग स्पर्धेत दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सने देखील खेळण्यास होकार दिला आहे, असे समजत आहे.
जगभरातील क्रिकेट स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व निर्माण करून झाल्यानंतर एबी डिविलियर्स आता नेपाळमध्ये ही फटकेबाजी करताना दिसणार आहे. तरी अजून ३७ वर्षीय एबी डिविलियर्सने याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. गतवर्षी ही स्पर्धा कोरोना असल्यामुळे स्थगित करण्यात आली होती. परंतु ,आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने ही स्पर्धा पुन्हा एकदा खेळवण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही स्पर्धा २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. एबी डिविलियर्सचे या स्पर्धेत खेळल्याने नेपाळमधील युवा खेळाडूंना याचा फायदा होणार आहे.
या स्पर्धसाठी एबी डिविलियर्स आणि ख्रिस गेलसारख्या दिग्गज खेळाडूंसह केविन ओब्रायन, पॉल स्टरलींग, रोहन मुस्तफा, रोलोफ वान डेर मेरवे आणि रिचर्ड लेवी यांनी देखील आपला सहभाग नोंदवला होता. तसेच या स्पर्धेत ६ संघ असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पंड्याचा कहर!!! मोईन अलीच्या एकाच षटकात लगावले ३ गगन चुंबी षटकार, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारत-इंग्लंड वनडे मालिकेत पडला षटकारांचा पाऊस; तीन सामन्यात मारले ‘इतके’ विश्वविक्रमी षटकार
INDvENG 3rd ODI: इंग्लंडच्या शेपटाची झुंज अपयशी; भारताने ७ धावांनी विजय मिळवत मालिका घातली खिशात