---Advertisement---

“त्याला स्वार्थी म्हणणे चुकीचे, सत्य नेहमी उलटं असत”, विराटच्या भीडूचे त्याच्या टीकाकारांना प्रत्युत्तर

---Advertisement---

सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना पार पडला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.या पराभवासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाला, तसेच कर्णधार म्हणून विराट कोहलीचा कार्यकाळ ही संपला. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचा निर्णय घेतला होता. तर यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद देखील सोडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, एबी डिविलियर्सने विराट कोहलीच्या या निर्णयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

एबी डिविलियर्सने म्हटले की, “मला असे वाटते की, कर्णधार म्हणून विराटचे प्रदर्शन अविश्वसनीय होते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला त्याच्या नेतृत्वाखाली खेळायची संधी मिळाली. मी देखील गेल्या काही वर्षांपासून त्याचा चाहता झालो आहे. कारण त्याने भारतीय संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची जबाबदारी अतिशय उत्तम रित्या पार पाडली आहे. याच कारणाने मी त्याच्या चाहता आहे. मला वाटते की,त्याचा हा निर्णय त्याला दबावातून बाहेर येण्यास मदत करू शकतो.”

कर्णधार म्हणून तो अविश्वसनीय आहे – एबी डिविलियर्स
डिविलियर्स म्हणाला, “आयपीएल स्पर्धेत नेहमीच विराट कोहली क्रिकेटचा आनंद घेत असतो. कारण या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत मस्ती करण्याची संधी मिळत असते. त्यानंतर तो भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी जात असतो. जिथे खूप दबाव असतो. गेल्या काही वर्षांपासून हेच सुरू आहे. याचा त्याच्या क्षमतेशी काहीच संबंध नाहीये. तो कर्णधार म्हणून अविश्वसनीय होता.”

“रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी त्याने नेहमी पुढे येऊन नेतृत्व केले आहे. त्याने भरपूर धावा केल्या आहेत. मी त्याला कर्णधार म्हणून जाताना पाहून खूप दुःखी आहे. मी आशा करतो की, आम्ही आणखी काही वर्ष एकत्र राहू आणि ट्रॉफी देखील जिंकू,”असे एबी डिविलियर्स म्हणाला.

तसेच विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबत बोलताना एबी डिविलियर्स म्हणाला की, “मी देखील अशा परिस्थितीचा सामना केला आहे. त्यामुळे मी समजू शकतो की त्याच्या मनात काय सुरु असेल. त्यामुळे माझ्या मते विराट कोहलीला स्वार्थी म्हणणे चुकीचे आहे. काही खेळाडू असे निर्णय आपला कार्यभार कमी करण्यासाठी घेत असतात. अनेक लोक हे स्वार्थी नजरेने पाहतात. परंतु सत्य नेहमी उलट असते. माझ्यासोबत जेव्हा असे झाले होते, त्यावेळी मला देखील टीकेचा सामना करावा लागला होता.”

महत्त्वाच्या बातम्या – 

धवनची पुन्हा कासवगती खेळी; कारकीर्दीत इतक्यांदा ओढवलीय नामुष्की

कमी शिकलेले भारतीय खेळाडू कसे काय बोलतात फाडफाड इंग्रजी? घ्या जाणून

टी२० विश्वचषकासाठी चहलकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष; चाहत्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---